Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 रायगड

प्रगतिशील शेतकरी प्रा. डॉ. जयपाल पाटील यांना सरपंच सेवा संघ महाराष्ट्राचा समाज भूषण राज्यस्तरीय सन्मान 2026 पुरस्कार जाहीर

xtreme2day   25-05-2026 16:46:05   2735214

प्रगतिशील शेतकरी प्रा. डॉ. जयपाल पाटील यांना सरपंच सेवा संघ महाराष्ट्राचा समाज भूषण राज्यस्तरीय सन्मान 2026 पुरस्कार जाहीर

 

अलिबाग (प्रतिनिधी) - संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी व त्यांच्या संघटना सदस्यांना केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारच्या योजनांची माहिती माहिती आणि शेतकऱ्यांच्या आपत्ती सुरक्षा विषयक मार्गदर्शन करणारे रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील प्रगतिशील शेतकरी प्राध्यापक डॉ. जयपाल पाटील यांना महाराष्ट्र राज्यात अग्रेसिव सरपंचांसाठी कार्यरत असलेली स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे चळवळीचे नेते बाबासाहेब पावसे पाटील यांनी राज्यस्तरीय सन्मान 2026 समाज भूषण पुरस्कार जाहीर केला आहे.

 

सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य आयोजित समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व आपल्या कर्तुत्वाने समाजापुढे आदर्श ठेवणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते आपल्या कार्याचा आढावा घेतला असता आपण अत्यंत शिरीरीने चिकाटीने आणि आत्मविश्वासाने आपले ध्येय साध्य केले आहे आपल्या या उत्तुंग कामगिरीचा आणि समाज हितार्थ असलेल्या धडपडीचा आम्हास सार्थ अभिमान आहे आपल्या या संघर्षाचा आणि कर्तुत्वाच्या यथोचे सन्मान करण्यासाठी सरपंच सेवा संघाच्या निवड समितीने आपली निवड राज्यस्तरीय सन्मान 2026 साठीकेली आहे, हे कळविताना आम्हाला आनंद होत आहे हा गौरव सोहळा सरपंच सेवा संघाचे समर्थक माननीय बाबासाहेब पावसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होणार आहे.

 

हा सन्मान सोहळा शिर्डी लोकसभेचे खासदार मा. भाऊसाहेब वाकचौरे ग्रामसेवक नेते श्री. एकनाथराव ढाकणे यांच्या शुभहस्ते श्री. बबनराव पावसे पाटील, श्री रोहित पवार, यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक 5 जुलै 2026 सकाळी 11 वाजता माऊली संकुल सभागृह, सावेडी रोड, अहिल्यानगर येथे संपन्न होणार आहे असे श्री. बाबासाहेब पाटील यांनी पत्राद्वारे डॉ. जयपाल पाटील यांना कळविले आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती