विद्यार्थ्याला दिलेल्या विषयांवर आपले विचार मांडता यावेत यासाठी रायगडचा युवक फाउंडेशन तर्फे १ जुनला रायगड जिल्हा स्तरीय विद्यार्थी आणि खुली वकृत्व स्पर्धेचे आयोजन
xtreme2day
19-05-2026 20:44:08
324335
विद्यार्थ्याला दिलेल्या विषयांवर आपले विचार मांडता यावेत यासाठी रायगडचा युवक फाउंडेशन तर्फे १ जुनला रायगड जिल्हा स्तरीय विद्यार्थी आणि खुली वकृत्व स्पर्धेचे आयोजन
अलिबाग (प्रतिनिधी) -- विद्यार्थ्याला दिलेल्या विषयांवर आपले विचार मांडता यावेत यासाठी रायगडचा युवक फाउंडेशन तर्फे १ जुनला रायगड जिल्हा स्तरीय विद्यार्थी आणि खुली वकृत्व स्पर्धेचे आयोजन सकाळी १० वाजता वात्सल्य वृद्धाश्रम आणि गोशाळा सांबरी येथे आयोजित केली आहे.
यामधे इयत्ता ८ वी ते कॉलेजच्या विद्यार्थी यांना विषय१)राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे न्यायदान २)डॉक्टर बाबासाहेबांनी महिलांसाठी केलेले कार्य ३) स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी अनुभवलेले अंदमानातील दिवस ४) सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांचे शैक्षणिक कार्य ५)छत्रपती संभाजी राजे यांचे शैक्षणिक कार्य, असे विषय असून यासाठी पहिला गट प्रथम क्रमांक रुपये २०००, प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक रुपये १५००,प्रमाणपत्र तृतीय क्रमांक रुपये १००० खुल्या गटासाठी प्रथम क्रमांक रुपये २०००, प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक रुपये १५००,प्रमाणपत्र तृतीय क्रमांक रुपये १००० यासाठी प्रवेश ही १०० रुपये ठेवण्यात आली आहे. सर्व सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.
यासाठी नोंदणी डॉ. संदीप वारगे, मो.९२७२६९८९२४,( अलिबाग ) प्राध्या. संतोष पाटील मो.9820600857,( साबरी) एडवोकेट सतीश शेळके( कर्जत) 9881132248, श्री उदय सबनीस मो. 9325624616,( मुरुड ) एडवोकेट दीपक पाटील मो. 9870383881(पनवेल ) येथेही नोंदणी करू शकताअसे आवाहन रायगडचा युवक फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्या. डॉ. जयपाल जना परशुराम पाटील यांनी केले आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.