Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 रायगड

प्रत्त्येकाने आपल्या गावासाठी योगदान द्यावे -सौ.रसिका केणी पाटील

xtreme2day   30-03-2026 21:03:39   1695918

प्रत्त्येकाने आपल्या गावासाठी योगदान द्यावे -सौ.रसिका केणी पाटील

अलिबाग (प्रतिनिधी) - कुटुंबातील सर्वात  महत्वाची  व्यक्ती म्हणजे  जबाबदारी घेणारी, काळजी करणारी प्रमुख महिला असुन ती प्रत्त्येकाचे आरोग्यावर लक्ष ठेवते, मात्र त्यानां वेगवेगळ्या समस्यांना सामोरे  जावे लागते. यासाठी सांबरी-कुर्डुस परिसरातील महिलांची मोफत आरोग्य तपासणी व मुला मुलीसाठी सैन्य भरती मार्गदर्शन ऊदघाटन प्रसंगी रायगड जिल्हा परिषद महिला व बालकल्याण  सभापती रसिका केणी-पाटील यांनी सांगितले. 

यावेळी व्यासपीठावर आटपाटी सांगली जिल्ह्यातील डॉ. संजय कदम , ज्येष्ठ पत्रकार व आपत्ती व्यवस्थापन तज्ञ प्रा.डॉ.जयपाल पाटील, डॉ.सारीका पाटील, पाली-सुधागड, डॉ. वैशाली पाटील, सांबरी श्री.संतोष पाटील, वात्सल्य वृध्दाश्रम व गोशाळाचे मालक, श्री.संतोष  तावडे, अध्यक्ष  व श्री.राजेंद्र  म्हात्रे  सदस्य  अखिल भारतीय पुर्व सैनिक परिषद रायगड, निवृत्त पोलीस अधिकारी श्री.राजु पाटील,श्री.प्रल्हाद   माने,श्रीमती उमिॅला वारळकर, लायन्स  अध्यक्षा ठाणे श्री.सुभाष म्हात्रे  अध्यक्ष  जेष्ठ नागरिक कुर्डुस आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळेस रसिका केणी-पाटील य व पाहुणे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन श्री.संतोष पाटील यांनी सन्मान केला. यावेळी त्या म्हणाल्या   उपमुख्यमंत्री एकनाथ  शिंदे,साहेब आमचे नेते आमदार महेंद्र दळवी साहेब यांनी सभापती पदाची संधी दिल्याबद्दल आभारी असुन मतदार संघातील  सर्वाच्या कामासाठी मी बांधील असुन आश्वासन देणार नाही काम करणार आणी प्रत्त्येकाने आपल्या समाजासाठी योगदान द्यावे अश्या त्या म्हणाल्या, यावेळेस डाॅ. संजय कदम यांनी आपल्या आहारात बाबत शरीराचे फायदे तोटेची माहीती दिली. तर  भारतीय सैन्यात  भरती होऊन  देशसेवेत योगदान द्यावे, व कश्या प्रकारे भरती होता येते याची माहीती व  आपले युध्दातील अनुभव  सांगितले. जगभर सायकल स्वार म्हणून प्रसिद्ध सांबरीचे निवृत्त पोलीस अधिकारी यांनी तरुण  तरुणीनी पोलीस  व सैन्यात भरती होणे असल्यास  सायकल  चालवा,तुम्ही तंदुरुस्त  राहुन देशाचे पेट्रोल ,डिझेल  वाचविण्यात  मदत कराल असे सांगितले.यावेळेस आपत्तीव्यवस्थापन तज्ञ प्रा.डॉ.जयपाल पाटील यांनी वयोमानानुसार औषधाचा वापर आपल्या घरात असतोच यासाठी आजी,आजोबाच्या गोळ्याच्या डबे वेगवेगळे ठेवावेत कारण घरात नातवंड  आवडीने गोळ्या देतात  मात्र  बदलल्या गेल्यावर आपत्ती येते याची कायम  काळजी  घ्यावी, यावेळेस अदिवासी व ओ.बी.सी.समाजातील 40 मुला मुलींनी सैन्य  भरतीचा लाभ घेऊन 160 जणांनी डॉ.संजय कदम, डॉ.सारिका पाटील, डॉ.वैशाली पाटील यांचे कडुन,महिला,मुलीची तपासणी, मिशन फिट ईडिया च्या  अद्यावत मशीन वर आरोग्य सल्लागार श्री.विश्वास  गायकवाड, प्रा. नंदकुमार शंकर  लोहार, कु.चैतन्य  यांनी तपासणी केली,कार्यक्रम  यशस्वी करण्यास श्री.विरेंद्र पाटील (वेल्डर) श्री. विजय  म्हात्रे (गवंडी)श्री.रामदास  म्हात्रे (पेंटर) श्री.दाजी लेडीं, श्री.महादेव पाटील श्री.संजु पाटील, श्री.विकास  रणपिसे, श्रीमती नुतन पाटील यांनी मेहनत घेतली उपस्थित  नागरिकानां शुध्द शाकाहारी भोजन देऊन  सर्वाना अल्कालाईन वाॅटर च्या  बाटल्या दिल्या  शेवटी आभार श्री.अशोक (डाऊर)यांनी मानले.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती