Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 पुणे शहर

गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा; अफवांवर विश्वास ठेवू नका – पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आवाहन

xtreme2day   12-03-2026 21:43:56   3672174

गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा; अफवांवर विश्वास ठेवू नका – पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आवाहन

 

पुणे (प्रतिनिधी) – पुणे जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून त्याचा पुरवठा नियमितपणे सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

 

  जिल्ह्यातील सर्व एलपीजी वितरक तसेच तेल कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. नागरिकांना नियमितपणे गॅस सिलेंडरचा पुरवठा होत असून कोणतीही टंचाई निर्माण झालेली नाही.

 

जिल्हा प्रशासन व जिल्हा पुरवठा विभागामार्फत सर्व गॅस एजन्सींवर सतत देखरेख ठेवण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय फिरती व दक्षता पथके गठित करण्यात आली आहेत. कोणत्याही वितरकाकडून कृत्रिम टंचाई निर्माण करणे, जादा दराने विक्री करणे किंवा इतर अनियमितता आढळल्यास संबंधितांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.तसेच हॉस्पिटलसारख्या अत्यावश्यक सेवांना तसेच विद्यार्थ्यांच्या शासकीय वसतिगृहांना गॅस सिलेंडरचा पुरवठा प्राधान्याने करण्यात यावा, अशा सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

 

जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती