Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 रायगड

वरसोली येथील इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमध्ये छत्रपती शिवाजीमहाराज यांची जयंती साजरी

xtreme2day   21-02-2026 21:08:12   659031

वरसोली येथील इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमध्ये छत्रपती शिवाजीमहाराज यांची जयंती साजरी

 

अलिबाग (प्रतिनिधी) - वरसोली येथील इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या  हायस्कूलमध्ये छत्रपती शिवाजीमहाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे रायगड भूषण प्रा.डॉ.जयपाल पाटील  व सन्मानिय पाहुणे एड. श्रीराम ठोसर तर कार्यक्रम अध्यक्ष  शाळेचे मुख्याध्यापक श्किरण पाटील हे होते.

 

प्रारंभी राजे छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार, दिप प्रज्वलन, पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले.यावेळेस पाहुण्यांचे स्वागत  मुख्याध्यापक श्री.किरण पाटील यांनी केले.यावेळी अँड. श्रीराम ठोसर यांनी मुलांना  राजांचा जन्माचा इतिहास, आई-वडील आणी गुरुजनांचा आदर नियमित ठेवून  अदिलशाही व निजाम शाहीला कौशल्याने कसे जेरीस आणले याची माहीती देऊन  जनतेच्या कल्याणासाठी सर्व धर्म भाव कसा जपला हे सांगुन प्रताप गडावरील अफझलखानाचा  वधाची माहीती दिली.

 

यावेळेस  शाळेतील कु.प्रणव  हुले, कुमारी  अपुर्वा भगत,कुमारी दिया बना, कुमारी अनघा  पाटील, कु.नैतिक गांवड,कुमारी हर्षदा कोळी,कुमारी श्रेया  गौतम,कुमारी तन्वी घरत,उर्वी घरत यांनी छत्रपती शिवाजीमहाराज यांच्याविषयी भाषणे केली.  यावेळी डॉ.जयपाल पाटील यांनी सांगितले.की बालमित्रांनो  तुम्ही देशाचे आधारस्तंभ आहात.एक कायम  लक्षात ठेवा स्वताच्या प्रदेशात प्रत्त्येक जण सिंह असतोपण स्वराज्याचा दरारा जन्मल्या नंतर अवघ्या  दशकात हजारो किलोमीटर दुर मस्कत पर्यंत पोहचविणारे, सागरी भुगोलाची नसतांनाही सामर्थ्यवान आरमार केले ते आपले राजे छत्रपती शिवाजीमहाराज होत, आणी आपण सारे भाग्यवान आहोत अलिबागचे कांन्होजी आंग्रे त्याच्या आरमाराचे सरखेल होते ,राज्याच्या असंख्य  गुणांपैकी एक गुण जरी आत्मसात  केलात तर आपल्या  आई-वडीलांचे,गावाचे,शाळेचे नांव उज्वल कराल असे सांगितले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.आशुतोष गुरव सर यांनी केले.तर आभार श्रीमती पुजा पाटील यांनी मानले.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
🥵💦 Transfer +1.824330 btc. Get > yandex.com/poll/MHjpsbzYiRKpBEU48DzHgH?hs=c49f2731ccb6806389563ce43cb8b2bb& 🥵💦 25-02-2026 13:02:13

2ekda5

xtreme2day.com
⛓️‍💥 Balance 1.824318 btc. Next >> yandex.com/poll/PdZ7vgekGrNakuXZcpiB6b?hs=c49f2731ccb6806389563ce43cb8b2bb& ⛓️‍💥 01-03-2026 17:54:08

5gagm8


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती