Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 रायगड

पर्यटकांसाठी अलिबागला चारचाकी बहुमजली वाहनतळ करावेत - प्रा.डॉ.जयपाल पाटील

xtreme2day   12-02-2026 21:04:26   1724330

 पर्यटकांसाठी अलिबागला चारचाकी बहुमजली वाहनतळ करावेत - प्रा.डॉ.जयपाल पाटील 

 

अलिबाग (प्रतिनिधी) -  अलिबाग तालुक्यात पर्यटकांच्या गर्दीमुळे चार चाकी वाहने मोठ्या प्रमाणात येत असून त्यासाठी बहुमजली वाहनतळ  नगरपरिषदेने निर्माण करावेत अशी मागणी नगराध्यक्ष कु.अक्षया प्रशांत नाईक यांना जेष्ठ पत्रकार तथा आपत्तीव्यवस्थापन तज्ञ प्रा.डॉ.जयपाल पाटील यांनी असे पत्र दिले आहे.

 

 महाराष्ट्र  मंत्रीमंडळात असलेल्या रायगडच्या माजी पालकमंत्री कु.अदिती  तटकरे  यांनी जिल्ह्यातील तमाम  शेतघर, आंबा, नारळ, सुपारी,हापूस आंबा  बागायत दार,जुनी टुमदार घरांच्या  मालकांचे उत्पन्न वाढावे म्हणून जगप्रसिद्ध  रायगड  जिल्हा पर्यटन  केल्याने  अलिबाग ,मुरुड, श्रीवर्धन तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावर  आणी कर्जत,पाली,खालापूर, माणगाव, म्हसळा,महाड येथील गड किल्ले, धरणे,नदीकाठावर  निसर्ग रम्य  ठिकाणी अफाट गर्दी  होत आहे. 

 

महाराष्ट्र  पर्यटन विकास महामंडळाकडून  न्याहारी निवास योजनेंतर्गत अधिकृत  परवाने घेऊन  प्रगती  साधली मात्र चार  चाकी वाहने ,छोट्या  मोठ्या बसचे प्रमाण  वाढत गेले व वाढत राहणार आहे. यासाठी शहरात मराठी शाळेत  क्रीडांगणात प्रत्त्येक  कोपऱ्यात बहुमजली  वाहनतळ  ऊभारावे, शाळेचा पट रोडावला आहेच.आता जी  शहरात प्रत्त्येक  रस्त्यावर  वाहतूक  कोंडी होते ती होणार  नाही व नगरपरिषदेला  शहर  प्रवेश फी मिळते  तशीच वाहनतळावर मोठ्या प्रमाणात मिळेल.सध्या कुटुंबासहित येणारे पर्यटक  जेवणाचा आनंद  ऊपभोगताना चुकीचे वाहन  लावल्याने वाहतूक पोलिसाच्या दंडात्मक कारवाई कारवाईला सामोरे जावे लागते.

 

त्या मुळे शहरातील काही युवक  युवतीना  रोजगार उपलब्ध होऊ शकेल. आपण व सदस्यांनी सुंदर अलिबाग साठी विचार करावा असे सांगितले.आहे अशीच  रायगडातील  पर्यटन स्थळांवर ग्रामपंचायतीला  बहुमजली वाहनतळ  बांधावित यासाठी निधी खासदार सुनील तटकरे, खासदार धैर्यशील पाटील, राज्य मंत्री कु.अदिती तटकरे,भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी,आमदार रवी पाटील, आमदार महेश बालदी,आमदार प्रशांत ठाकूर, खासदार धैर्यशील पाटील, आमदार महेंद्र  थोरवे यांनी त्याच्या कडुन  अथवा  महाराष्ट्र शासनाकडून  ऊपलब्ध करून रायगडातील वाहन तळाचा प्रश्न  सोडवतील व हजारो पर्यटकांचे आशीर्वाद घेतील असे वाटते. असेही आपल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे. 


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती