रायगड जिल्हा परिषदेत कमळ व घड्याळ फुलणार !
xtreme2day
09-02-2026 21:42:23
2950457
रायगड जिल्हा परिषदेत कमळ व घड्याळ फुलणार !
अलिबाग (डॉ.जयपालपाटील ब्युरोचीफ यांजकडून) - रायगड जिल्हा परिषदेच्या नुकताच झालेल्या निवडणुकीत 31ची संख्या भाजप आणी राष्ट्रवादी अजित पवार गटाने पुर्ण केली असुन प्रत्त्येकी अडीच वर्षाची सत्ता वाटुन घेऊन रायगड जिल्हा परिषदेवर कमळ फुलणार असे चित्र आज निकालानंतर दिसत आहे.
रायगडातील भाजप माजी खासदार रामशेठ ठाकूर, खासदार धैर्यशील पाटील, अनुभवी माजी म॓त्री आमदार रविंद्र पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी,यांच्या कुशल नेतृत्वाखाली आणि देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शहा, केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्याकडे विकासाच्या दृष्टिकोनातून यावेळी रायगडात भाजपचे पनवेल 8,खालापूर 1,पाली1,पेण 4,उरण 1असे 15 सदस्य निवडून आले आहेत.रायगडातील समर्थ नेतृत्व खासदार तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महाराष्ट्र अध्यक्ष सुनील तटकरे याच्या कुशल नेतृत्वाखालील कर्जत 4,खालापूर1,अलिबाग 1,रोहा 2,तळा 2,माणगाव 2,म्हसळा 2,श्रीवर्धन 2 असे 16 सदस्य निवडून आले आहेत.
भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र असल्याने राजिपचे एकुण सदस्य संख्या 59 असुन सत्तेत 31 जणांची आवश्यकता आहे त्यामुळे भाजपला संधी आहे.त्याच बरोबर रायगडात राज्याचे उपमुख्य मंत्री श्री.एकनाथ शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले, अलिबागचे कार्य सम्राट आमदार महेंद्र दळवी,कर्जतचे कार्य सम्राट महेंद्र थोरवे यांच्या कुशल नेतृत्वात खालापूर 1,सुधागड पाली 1,अलिबाग 6,मुरुड 2,रोहा,2,माणगाव 2,महाड 5,पोलादपूर 2 असे 21 सदस्य निवडुन आले असून, रायगडात कॉग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत व पदाधिकारीमुळे उरणला 2 सदस्य निवडुन आले असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उठाबाचे कर्जत 2,खालापूर 1,पेण 1असे 5 सदस्य निवडुन आले.
रायगड जिल्ह्य़ात एके काळी शेतकरी कामगार पक्षाची सत्ता जिल्हा परिषदेत असायची, मात्र माजी आमदार व पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जंयत पाटील यांचे बंधु माजी आमदार पंडित पाटील आणि माजी मंत्री मिनाक्षी पाटील यांचे चिरंजीव रायगड जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष अँड.आस्वाद पाटील हे भारतीय जनता पक्षात दाखल झाल्याने मतदारांनी पक्षाकडे पाठ फिरवल्याने एकही सदस्य निवडून आला नाही.या सर्व बेरीज वजा बाकिने रायगड जिल्हा परिषदेवर कमळ फुलणार आणी पेण मधील माजी अभ्यासु सदस्याची अध्यक्ष म्हणून वणीॅ लागेल अशी जोरदार चर्चा आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.