रायगडातील पशुसंवर्धन अधिकारीना आपत्ती व्यवस्थापनचे रायगड भूषण प्रा.डॉ.जयपाल पाटील यांचे मार्गदर्शन
xtreme2day
07-02-2026 22:45:28
1286918
रायगडातील पशुसंवर्धन अधिकारीना आपत्ती व्यवस्थापनचे रायगड भूषण प्रा.डॉ.जयपाल पाटील यांचे मार्गदर्शन

अलिबाग (प्रतिनिधी) -रायगड जिल्ह्यातील पशुसंवर्धन अधिकारी यांची जिल्हास्तरीय बैठक वरसोली येथे संपन्न झाली त्या मधे रायगड भूषण प्रा.डॉ.जयपाल पाटील आपत्ती व्यवस्थापन तज्ञ यांचे मार्गदर्शन झाले.
यावेळेस डॉ.जयपाल पाटील यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ डॉ.प्रशांत कांबळे प्रादेशिक सह आयुक्त पशुसंवर्धन मुंबई यांचे हस्ते करण्यात आले. यावेळेस डॉ.जयपाल पाटील यांचा परिचय डॉ.लोलगे यांनी करुन दिला.
त्यानंतर डॉ.जयपाल पाटील यांनी आपल्या सुरक्षे साठी कायम 108 बीव्हीजी चा वापर करावा,महिला डॉक्टरांनी महाराष्ट्र पोलीस 112क्रमांकाचा वापर करावा,गावातील शेतकरी च्या मुलींना बाळंतपणात 102 रुग्ण वाहिकेचा वापर करण्यास सांगावे, घरातील गॅस, सिलेंडर,जेष्ठ नागरिकांची काळजी घ्यावी याबद्दल माहीती दिली.यावेळी डॉ.सचिन देशपांडे जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय रायगड, अलिबाग, डॉ.साखरे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र पेण रायगड व रायगडातील जिल्ह्यातील उपस्थित सर्व सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक, 85 डॉक्टर उपस्थित होते. कार्यक्रमाचे डॉ. शामराव कदम, उपायुक्त पशुसंवर्धन यांनी आभार मानले.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.