xtreme2day 04-02-2026 22:34:26 2384714
पुण्याच्या महापौरपदी भाजपकडून मंजूषा नागपुरे तर अश्विनी लांडगे यांना काँग्रेस कडून उमेदवारी; 9 फेब्रुवारी रोजी होणार निवडणूक पुणे (विशेष प्रतिनिधी) - पुणे शहराच्या महापौरपदी मंजूषा नागपुरे यांची उमेदवारी भाजपाने केल्याने त्यांचा अर्ज आज नगरसचिव योगिता भोसले यांच्याकडे दाखल करण्यात आला. दरम्यान 119 एवढी भाजप संख्या असल्याने भाजपच्याच महापौर होतील हे निश्चित आहे. काँग्रेसकडून महापौर पदासाठी अश्विनी लांडगे,आणि उपमहापौर पदासाठी साहिल केदारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे 9 तारखेला निवडणूक होणार आहे. योगेश टिळेकर यांना आमदारकी दिल्याने त्यांच्या मातोश्री रंजना टिळेकर यांचा यांची उमेदवारी घोषित करण्यात आलेली नाही तर मानसी देशपांडे या आमदार, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या भावजयी आहेत. त्यामुळे त्यांना पद देण्यात आले नसल्याची माहिती आहे. वर्षा तापकीर यांना सव्वा वर्षानंतर महापौर पद देण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती आहे. सिंहगड रोडला प्रथमच महापौर पदाचा मान मिळाला आहे. नागपुरे सलग तिसऱ्यांदा नगरसेवक झाल्या, यंदाच्या निवडणुकीतही त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. पुणे महापालिकेची निवडणूक मैत्रीपूर्ण लढली गेली. देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनुसार महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध होईल ठरले होते. त्यामुळे या निवडणुकीत उमेदवार दिला जाणार नाही, अशी माहिती राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिली. मंजूषा नागपुरे या कडव्या हिंदुत्ववादी विचारसरणी, भाजपच्या निष्ठावंत नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात. महापालिकेच्या कामाच त्यांचा चांगला अनुभव आहे. स्थायी समितीसारख्या महत्त्वाच्या समितीवर त्यांनी काम केले आहे. महापौरपदासाठी रंजना टिळेकर, वर्षा तापकीर आणि मानसी देशपांडे यांच्या नावांची चर्चा होती पक्षीय बलाबल भाजप :119 राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : 27 काँग्रेस : 15 राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : 3 शिवसेना (UBT) : 01