Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 पुणे शहर

अजित पवार - शरद पवार गटाला दणका; पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिकेत भाजपच होणार कारभारी!

xtreme2day   15-01-2026 22:29:48   57103773

अजित पवार - शरद पवार गटाला दणका; पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिकेत भाजपच होणार कारभारी! 

 

पुणे (विशेष प्रतिनिधी)  पुण्यामध्ये पुन्हा एकदा भाजप आपला दबदबा कामय राखण्याची शक्यात असून, गेल्या वेळी पुणे महापालिकेत भाजपला 97 जागा मिळाल्या होत्या, तर यावेळी पुणे महापालिकेत भाजपला 93 जागा मिळण्याची शक्यता आहे.  कोल्हापूरमध्ये भाजपला 30 ते 32 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये 64 जागा मिळण्याची शक्यता आहे.  भाजपला पुण्यात पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज असून, हा दोन्ही राष्ट्रवादी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी मोठा धक्का असणार आहे.

 

भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज आहे. पोल ऑफ पोलच्या एक्झिट पोलनुसार पुण्यात भाजपला 93 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर शिवसेना शिंदे गटाला 6 जागा, शिवसेना ठाकरे गटाला 7 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 43 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 8 जागा मिळण्याचा अंदाज आहे, काँग्रेसला पुण्यात आठ जागा मिळण्याची शक्यता असून, मनसेचा एकही उमेदवार विजयी होणार नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये देखील भाजपच बाजी मारण्याचा अंदाज आहे. पोल ऑफ पोलच्या एक्झिट पोलनुसार पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला 64 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर शिवसेना शिंदे गटाला 09, राष्ट्रवादीला 51,  शरद पवार  गटाला 2  आणि काँग्रेस व मनसेला प्रत्येकी एक जागा मिळण्याचा अंदाज आहे. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चुरशीचा सामना पहायला मिळाला होता. या महापालिकेत एकूण 32 प्रभागातून 128 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. अशातच आता या महानगर पालिकेचा एक्झिट पोल समोर आला आहे. यात भाजपला बहुमत मिळताना दिसत आहे. PRAB च्या एक्झिट पोलनुसार पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला बहुमत मिळताना दिसत आहे. येथे भाजपला 64 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर अजित दादांच्या राष्ट्रवादीला 51, शिवसेनेला 9, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 2, काँग्रेसला 1 आणि मनसेला एक जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या महानगर पालिकेत पुन्हा एकदा भाजप सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे

 

 शुक्रवार दिनांक 16 रोजी म्हणजे उद्या महापालिका निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यापूर्वी आज एक्झिट पोलचे कल हाती आले आहेत. यावेळी मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची युती होती. एक्झिट पोलच्या कलानुसार मुंबईमध्ये भाजप शिवसेना युतीला 138 च्या आसपास जागा मिळण्याचा अंदाज असून, शिवसेना ठाकरे गट मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 58 ते 68 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

 

राज्यात आज 29 महापालिका निवडणुकीसाठी मतदान पार पडलं, त्यापैकी दोन महापालिका या नव्या आहेत, त्यामध्ये जालना आणि इचलकरंजी या महापालिकांचा समावेश आहे. तर इतर 27 अशा एकूण 29 महापालिका निवडणुकीसांठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. मतदान संपताच आता एक्झिट पोल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. हाती आलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात पुन्हा एकदा भाजपला मोठं यश मिळताना दिसत आहे. सर्वांचं लक्ष ज्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालाकडे लागलं आहे, त्या मुंबई महापालिकेत विविध एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. पोल ऑफ पोलच्या एक्झिट पोलनुसार मंबईमध्ये भाजप शिवसेना युतीला 137 जागा मिळण्याचा अंदाज आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती