xtreme2day 13-01-2026 19:59:50 673855
ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर 'कुलाबा जीवन गौरव' या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित अलिबाग (डॉ.जयपाल पाटील,ब्युरोचीफ यांजकडून) -ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांना माजी आमदार स्व. मधूशेट ठाकूर चॕरिटेबल ट्रस्ट व आमदार भाई जगताप मित्रमँडळ रायगड यांच्या विद्यमाने 'कुलाबा जीवन गौरव' या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्याबाबत त्यांचा छोटेखानी सत्कार त्यांच्या निवासस्थानी यादव गौळी समाजाच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष व नागोठणे ग्राम पंचायतीचे माजी सरपंच विलास चौलकर यांनी श्रीफळ व बुके देऊन केला. यावेळी आपल्या भाषणात श्री. चौलकर म्हणाले " वालेकर सर सामाजिक व शैक्षणिक आणि पत्रकार क्षेत्रात ६० वर्षे कार्यरत आहेत . त्यांनी अनेक सामाजिक व शैक्षणिक कामे केली आहेत. जिल्हा पासपोर्ट कार्यालय , जिल्हा कामगार न्यायालय , जिल्हा दूरसंचार कार्यालय त्यांच्या प्रयत्नामुळे जिल्ह्यात आले. सागरगड - माची येथील आदिवासींच्या भौतिक सुविधांसाठी ही ते अनेक वर्षे झगडले व शासनाकडून १० एकर जमीन मिळविण्यात यशस्वी झाले. त्यामुळे ते अनेक पुरस्कारांनी सन्मानित झाले आहेत. *कुलाबा जीवन गौरव* हा त्यापैकी एक पुरस्कार आहे . वयाची ८२ वर्षे उलटूनही ते कार्यरत आहेत .ते शतायु व्हावेत.या पुरस्कारा बाबत अनेक स्तरावरून अभिनंदन होत आहे.