Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 रायगड

शहिद हिराजी पाटील यांना वंदन करण्यास आगरी समाज बांधवांनी उपस्थित रहावे--प्रा.डॉ.जयपाल पाटील

xtreme2day   25-12-2025 19:36:55   782873

शहिद हिराजी पाटील यांना वंदन करण्यास आगरी समाज बांधवांनी उपस्थित रहावे -प्रा.डॉ.जयपाल पाटील 

 

अलिबाग (प्रतिनिधी)--भारत देश स्वतंत्र व्हावा म्हणून लढणारे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मानिवली या गावचे आगरी समाजातील ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीत लढणारे पहिले शहिद हिराजी पाटील यांचा शुक्रवार 2 जानेवारी स्मृतिदिना निमित्त त्याच्या कार्याची ओळख आगरी समाजातील तरुण, तरुणी,शालेय विद्यार्थी  समाज बांधवांना व्हावी यासाठी रायगडचा युवक फाउंडेशनने निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते.यांचे शुक्रवार 2 जानेवारीला सकाळी 7.30 वाजता आदर्श पतसंस्थेच्या अलिबागेतील  मुख्य कार्यालयाच्या सभागृहात मान्यवरांकडून बक्षिस वितरण व  मार्गदर्शन होणार आहे.

 

अलिबाग तालुक्यातील  इयत्ता 5वी ते 7वी, 8वी ते 10वी,11वी ते15 वी गट, व खुला यामधे सर्वाना भाग घेण्यास आवाहन  केले होते, यात शहिद हिराजी पाटील यांचे जीवन चरित्रावर 2 पुर्ण ताव मराठीत पाठवावा.असे प्रसिद्ध केले होते,यामधे गटास प्रथम क्रमांक रु.501,द्वितीय क्रमांक रु.300,तृतीय रु.200 व प्रमाणपत्र असे बक्षीस आहे. 

 

या पहिल्याच स्पधेॅत  आर.सी.एफ. माध्यमिक विद्यालय  कुरुळ ,जनरल अरुण कुमार वैद्य माध्यमिक विद्यालय,जे.एस.एम.कॉलेज येथून  50   विद्यार्थी सहभागी झाले आहेत.  त्यांना मान्यवरांकडून बक्षिस वितरण व  मार्गदर्शन होणार असून सहभागी विद्यार्थी-पालकांनी उपस्थित रहावे,अलिबागचे देशप्रेमी नागरिक  सहभागी होऊ शकतात.सहभागीनां  समारंभात  बक्षीस, प्रमाणपत्र, त्वरित  देण्यात येणार असून नंतर मिळणार नाही,याची नोंद घ्यावी असे प्रा.डॉ. जयपाल पाटील, यांनी कळविले आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती