संविधान म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांची देशाला अनमोल देणगी--प्रा.डॉ.जयपाल पाटील
xtreme2day
01-12-2025 21:39:13
7820789
संविधान म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांची देशाला अनमोल देणगी--प्रा.डॉ.जयपाल पाटील
कर्जत (प्रतिनिधी) - संपुर्ण देशातील अठरापगड जाती आणी धर्माच्या कल्याणासाठी अतिशय अभ्यासपूर्ण लिहलेले संविधान अनमोल ग्रंथ असुन त्याचे वाचन आणी पालन प्रत्त्येक नागरिकाने केले पाहिजे,त्यामुळेच सर्व आंनदी राहतील असे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार विजेते प्रा.डॉ.जयपाल पाटील यांनी भारतीय बौद्ध महासभेने शहरातील मुख्य आंबेडकर चौकात आयोजित कार्यक्रमात सांगितले.
यावेळेस जेष्ठ नागरिक, संविधान गौरव समिती पदाधिकारी,सदस्य, मराठी चित्रपट निर्माते,कोमसापचे अध्यक्ष अँड.गोपाळ शेळके उपस्थित होते.
प्रारंभी सर्व उपासक,उपासिका, बौद्धाचार्य यांनी सामुदा ईक प्रार्थना व संविधान वाचन केले.बौद्ध महासभे तर्फे प्रमुख पाहुणे रायगड भूषण प्रा.डॉ.जयपाल पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केल्यावर त्यांनी 76 व्या संविधान दिनानिमित्त शुभेच्छां देऊन बाबासाहेबांना संविधान लिहीण्याचा कार्यकाळ सांगुन महाराष्ट्र शासनाचे आभार मानून घरा-घरात संविधान पोहचविण्यात येणार आहे, डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान सर्वा साठी तयार केले असून मी जसा आपल्या बुध्द विहारात मोफत आपत्ती मार्गदर्शन व 5 पुस्तके देतो त्यामधे संविधान देतो,तसे आपणही पुष्पगुच्छ न देता करावी.त्याच बरोबर आपल्या सुरक्षेसाठी अपघात व साप,विंचु दंश झाल्यास बीव्हीजी कंपनीची व महिलांच्या बाळंतपणात महाराष्ट्र शासनामार्फत जिल्हा परिषद आरोग्य केंद्रातील 102 रुग्णवाहिकेस पाचारण करावे,आणी महिला, मुलीच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलीस 112क्रमांकावर संपर्क साधणे,असे मार्गदर्शन केले,यावेळेस अँड.गोपाळ शेळके यांनी त्यानी लिहलेली संविधानावरची कविता सादर केली तिला सर्वानी दाद दिली,सर्वाना पेढे वाटून आनंद घेतला.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.