xtreme2day 28-11-2025 22:07:03 845011
अलिबाग तालुक्यातील तळाशेत प्राथमिक शाळेत संविधान दिन साजरा अलिबाग (प्रतिनिधी) - अलिबाग तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेची तळाशेत येथे शिक्षक, विद्यार्थी सोबत संविधान दिन साजरा केला. यावेळेस पाहुणे जेष्ठ पत्रकार, डॉ.जयपाल पाटील उपस्थित होते.सुरुवातीस उपशिक्षीका जस्मिन शेख,यांनी संविधान वाचन करून सर्वानी साथ दिली व पाहुण्यांची ओळख करून दिली.यानंतर मुख्याध्यापक श्री.ज्ञानेश्वर शिंदे यांनी डॉ.जयपाल पाटील यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन विषयी व संविधान लिहिण्यास धालविळेला काळ व देशातील सर्व जाती धर्मातील जनतेच्या कल्याणासाठी संविधान तयार केल्याची माहीती देऊन यात्रेत व प्रवासात आपले आई,बाबा पासुन दूर अथवा हरविले तर न घाबरता पोलीस मामा अथवा मावशी यांचे जवळ जावे,अनोळखी सोबत जाऊ नये आणी आपल्या आई-वडील, काका,मामा यांचे मोबाईल क्रमांका चिठ्ठी जवळ ठेवावी म्हणजे तुम्ही सुरक्षित रहाल असे प्रा.डॉ.जयपाल पाटील यांनी सांगितले. शेवटी शालेय व्यवस्थापन उपाध्यक्ष श्रीमती वैशाली बोईटे यांनी आभार मानले
g2i85r