Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 पुणे शहर

पुण्यातील नवले पूल परिसरात ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने २० ते २५ वाहनांना दिली धडक; या भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू, २० जण जखमी

xtreme2day   13-11-2025 22:48:12   4926007

पुण्यातील नवले पूल परिसरात ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने २० ते २५ वाहनांना दिली धडक; या भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू, २० जण जखमी

 

पुणे (विशेष प्रतिनिधी) - पुण्यातील नवले पूल परिसरात मोठा अपघात झाला आहे. ब्रेक फेल झालेल्या कंटेनरनं २० ते २५ वाहनांना धडक दिली. हा कंटेनर धडका देत भरधाव वेगात निघाला होता. त्याच्यापुढे एक कंटेनर होता. त्या कंटेनरला धडक देण्याआधी ब्रेक फेल झालेल्या कंटेनरनं एका कारला धडक दिली. लहान कार दोन कंटेनरच्या मधोमध अडकली. या कारचा चक्काचूर झाला. सीएनजीवर चालत असलेल्या कारनं पेट घेतला. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. यातील काही जणांनी प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

 

 नवले पूल परिसरात आज संध्याकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. साताऱ्याहून मुंबईच्या दिशेला निघालेल्या कंटेनरनं अनेक वाहनांना धडक दिली. हा कंटेनर मंद उतारावरुन खाली येत होता. जवळपास २० ते २५ वाहनांना धडक देत तो पुढे गेला. त्यानंतर या कंटेनरनं एका फॅमिली कारला धडक दिली. कंटेनरची धडक बसल्यावर कार अचानक पुढे गेली. कारच्या पुढे दुसरा कंटेनर होता. दोन कंटेनरच्या मध्ये कार अडकली. कारमध्ये सीएनजीचा सिलिंडर होता. दोन कंटेनरच्या मधोमध अडकल्यानं कारचा चेंदामेंदा झाला. सिलिंडरचा स्फोट होताच आग लागली. त्यामुळे मागील कंटेनरदेखील पेटला.

 

अपघात ग्रस्त कंटेनरमधून एक मृतदेह बाहेर काढण्यात आला असून कारमधून दोन महिला आणि एका मुलीचा मृतदेह काढण्यात यश आलं आहे. आणखी मृतदेह हाती लागण्याची शक्यता आहे. या अपघातात २० जण जखमी झाले आहेत. त्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

 

दरम्यान,  या घटनेनंतर महामार्गावर वाहतूक ठप्प झाली असून. अग्निशमकचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झालं होतं. घटनास्थळावर धूर आणि आगीचे लोट पसरले होते. नवले पुल परिसरात अशा प्रकारचे अपघात वारंवार घडत असल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, गाड्यांची एकमेकांना धडक झाल्यानंतर दोन ते तीन वाहनांनी पेट घेतला. यामध्ये अनेकजण जखमी आहेत. सध्या पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आहे. या अपघातानंतर अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर काही काळासाठी रस्त्यावरची वाहतूक थांबवण्यात आली आहे. अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवला आहे. सध्या बचाव कार्य सुरू आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती