जे.एस.डब्ल्यू.कंपनीची परीसरातील गावांना प्रदूषणाची भेट ! कंपनीवर कठोर कारवाई करावी - मंगेश भगत
xtreme2day
23-09-2025 17:39:23
2740687
जे.एस.डब्ल्यू.कंपनीची परीसरातील गावांना प्रदूषणाची भेट ! कंपनीवर कठोर कारवाई करावी - मंगेश भगत
अलिबाग (डॉ.जयपाल पाटील ब्युरोचीफ याजकडून) - पेण तालुक्यातील धरमतर येथे जे.एस.डब्ल्यू कंपनी आपला अवाढव्य विस्तार करीत असून प्रदुषण नियंत्रणाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असून त्याची आरोग्याची झळ परिसरातील नागरिकांवर आली आहे याकडे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा परिसरात जोर धरु लागली आहे. यासाठी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे शहाबाजचे सामाजिक कार्यकर्ते श्री.मंगेश भगत यांनी लेखी निवेदन सादर केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, 2000 कोटी रुपये प्रदुषण नियंत्रणासाठी वापरले तरीसुद्धा परिसरातील घराच्या गच्चीवर पाय ठेवताच काळे कुट्ट होतात, हवेत तरंगणारे धुळीकण शहाबाज, मेढेखार, कुसुबंळे, नवेनगर ते सागर गडाच्या पायथ्यापर्यंत गावात जात आहे.यामुळेच नागरिकांवर न्युमोनिको आणि तत्सम रोगांचे प्रमाण वाढत असून त्याचे आयुष्यमान कमी होत आहे. त्या मुळे भातपिकाचे उत्पादन प्रचंड कमी झाले असुन भाताचा पेंढा खाणे बंद झाली, सबब परिसरातील गाईगुरांचे प्रमाण शून्यावर आले आहे.
या कंपनीच्या चिमणीतुन हवेत धुळीकणात सिलीका, लोह,गंधक, कार्बन, असेॅनिक,नायट्रन, ऑकसाईड असे घातक रसायने मुळे घातक परिणाम दिसून येत आहेत. श्रीगाव व तिनविरा धरणातील पाण्याच्या चवीत फरक पडत आहे.धरमतर खाडीत प्रदुषणा मुळे मासेमारीवर गदा आली आहे, हे मासे खाउन लोक आजारी पडू लागले यामुळेच परिसरातील 40 गावात प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी केव्हा चौकशी करण्यात आले त्याची नोंद वही दाखवावी व ती जाहीर करावी.
शिवाय रायगड जिल्ह्यातील अनेक युवक युवती ईजिनियरींग केलेत परंतु त्याची भरती न करता परराज्यातील कामगार मुंबई त भरती केली व त्याच्या साठीअनेक बस मुंबई, ठाणे,पनवेल येथुन येउ लागल्या त्यामुळे पेण तालुक्यातील जनतेने याविषयावर संघर्ष समिती स्थापन केली असून कंपनीत स्थानिक भरती,प्रदुषण नियंत्रण याविषयावर जोरदार लढा उभा राहणार आहे. या कंपनीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आपल्या ताब्यात घेऊन परिसरातील जनतेला हळुहळू मृत्यु कडे पाठविणयाचे कार्य सुरु केल्याची चर्चा परिसरात होत आहे, सरकारने या सर्व गंभीर बाबीची दखल घ्यावी आणि संबंधित कंपनीवर गुन्हे नोंद करावी व नागरिकांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सर्वत्र केली जात आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.