पत्रकारांच्या पीएफ आणि पेन्शनची प्रकरणे त्वरीत मार्गी लावण्यात येतील ; भविष्य निर्वाह निधी आयुक्त अमित वसिष्ट यांनी दिले पत्रकारांच्या शिष्यमंडळाला आश्वासन
xtreme2day
23-08-2025 20:29:41
983570
पत्रकारांच्या पीएफ आणि पेन्शनची प्रकरणे त्वरीत मार्गी लावण्यात येतील ; भविष्य निर्वाह निधी आयुक्त अमित वसिष्ट यांनी दिले पत्रकारांच्या शिष्यमंडळाला आश्वासन
पुणे (प्रतिनिधी) - भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आणि निवृत्ती वेतन (पेन्शन) संदर्भातील पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्नांवर त्वरीत लक्ष घालून,संबंधित प्रकरणे लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन पुणे विभागाचे भविष्य निर्वाह निधी आयुक्त अमित वसिष्ट यांनी दिले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने, पत्रकारांच्या शिष्टमंडळांने शुक्रवारी (ता.२२) अमित वसिष्ट यांची भेट घेतली. पत्रकारांच्या संघटनेमार्फत पहिल्यांदाच या भेटीचे आयोजन करण्यात आले होते.
या भेटी दरम्यान, भविष्य निर्वाह निधी आयुक्त (टू) सुरज पाटील, भविष्य निर्वाह निधी आयुक्त (टू) सुदर्शन भालाधरे , भविष्य निर्वाह निधी आयुक्त (टू) दुर्गेशकुमार उपस्थित होते.ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर,पत्रकार संघाचे सरचिटणीस मंगेश फल्ले, खजिनदार दिलिप तायडे, पत्रकार प्रसाद पाठक आणि संघाच्या पदाधिकार्यांच्या वतीने अमित वसिष्ट यांना स्मृतिचिन्ह आणि अभिजात मराठी भाषेवर आधारित पत्रकार संघांची, ‘वृत्तभाषा’ ही स्मरणिका भेट देण्यात आली.
पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाच्या वतीने आयुक्तांना, पत्रकारांना पीएफ आणि पेन्शन संदर्भात भेडसावणार्या अडचणींसदर्भातील माहिती देण्यात आली. तसेच पीएफ आणि पेन्शन संदर्भातील अडचणी सोडविण्याची विनंती भविष्य निर्वाह निधी आयुक्तांना केली. अमित वसिष्ट यांनी देखील पत्रकारांच्या अडचणीं समजून घेतल्या आणि त्या सोडविण्यासाठी समन्वयक नेमण्यात येईल. त्याद्वारे तांत्रिक बाबींची पूर्तता करून पत्रकारांची पीएफ आणि पेन्शन संदर्भातील प्रकरणे मार्गी लावण्यात येईल,असे आश्वासन दिले.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.