केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे एमबीबीएस प्रवेशासाठी तात्काळ पाठपुरावा !
xtreme2day
14-07-2025 22:17:17
643260
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे एमबीबीएस प्रवेशासाठी तात्काळ पाठपुरावा !
मुंबई, (प्रतिनिधी) –एक होतकरू आणि विद्यार्थिनी वैद्यकीय शिक्षणासाठी (MBBS) प्रवेश प्रक्रियेत अडचणीत सापडली होती. या प्रकरणात तुषार तानाजी कांबळे, महाराष्ट्र राज्य सचिव – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), श्रमिक ब्रिगेड यांनी विद्यार्थिनीच्या पालकासह थेट केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. रामदास आठवले साहेब यांच्या मुंबई कार्यालयात भेट घेतली.
🔹 विद्यार्थिनीच्या प्रवेश प्रक्रियेतील अडथळ्यांविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.
🔹 मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कॉल करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
🔹 मा. आठवले साहेबांनी अत्यंत संवेदनशीलपणे या बाबीचा तपशील घेतला व शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
तुषार तानाजी कांबळे यांची प्रतिक्रिया:
> "मी विद्यार्थिनीला शिक्षणाचा न्याय मिळावा म्हणून तिच्या पालकाला घेऊन मंत्री महोदयांकडे गेलो. शिक्षण म्हणजे केवळ करिअर नाही, तर सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे.
महात्मा फुले म्हणत – ‘शिक्षणाशिवाय समाजाचा उद्धार अशक्य आहे.’
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले – ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ – हेच तत्व मनात ठेवून, मी या प्रकरणात पुढाकार घेतला आहे.
एकही मुलगी आर्थिक किंवा सामाजिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये, हेच आमचे ध्येय आहे.*"
या विशेष भेटीस उपस्थित असलेले पदाधिकारी:
▪️ सत्तारभाई शेख – पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष, आर. पी. आय. (आठवले) श्रमिक ब्रिगेड
▪️ सोनीताई रामनानी – पुणे जिल्हा उपाध्यक्षा (महिला), आर. पी. आय. श्रमिक ब्रिगेड
▪️ प्रकाश साबळे – देहूरोड शहराध्यक्ष, आर. पी. आय. श्रमिक ब्रिगेड
या पुढाकारामुळे विद्यार्थिनीच्या वैद्यकीय शिक्षणाच्या वाटचालीला नवी दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.