केशवनगर - खराडी भागाला जोडणाऱ्या नदीवरील पुलाचे काम तातडीने करा या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने नदीत दोर टाकून तीव्र आंदोलन !
xtreme2day
09-07-2025 20:32:29
1346098
केशवनगर - खराडी भागाला जोडणाऱ्या नदीवरील पुलाचे काम तातडीने करा या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने नदीत दोर टाकून तीव्र आंदोलन !
पुणे (प्रतिनिधी) - हडपसर व वडगाव शेरी मतदार संघाला जोडणारा रस्ता म्हणजे केशवनगर - खराडी भागाला जोडणाऱ्या नदीवरील पुलाचे काम मागील आठ वर्षापासून अतिशय संथ गतीने चालू आहे. आणि मागील पाच महिन्यांपासून बंद आहे. सत्ताधारी व निष्क्रिय पुणे महापालिका प्रशासन कोणतेही ठोस उत्तर देत नाही. त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या विरोधात सदर अर्धवट बांधलेल्या पुलावर उभे राहून शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पुलावरून दोर टाकून तानाजी मालुसरे प्रमाणे नदित उतरून पलिकडे जाण्याचा प्रयत्न केला. पोलीसांनी त्यापासून रोखले. सत्ताधारी व प्रशासनाचा तीव्र निषेध करून आंदोलन करण्यात आले.
हा पूल पूर्ण झाला आणि खराडी भाग केशवनगरला जोडला गेला तर खराडीतील बांधकाम व्यावसायिकांच्या सदनिकांना भाव मिळणार नाही. कारण सत्ताधारी आमदार, मंत्री यांचे आर्थिक हितसंबंध यांच्याशी जोडले गेले आहेत. महाराष्ट्र राज्यातील व परराज्यातील पूल विक्रमी वेळेत पूर्ण होतात. सत्ताधारी स्वतःची पिठ थोपटून घेतात. मग हा पूल का पूर्ण होत नाही. हे अपयश सत्ताधारी का स्वीकारत नाही. कोणाकोणाचे हितसंबंध यामधे गुंतले आहेत ? प्रशासनावर कोणाचा दबाव आहे ? हे पुणे मनपाचा कर भरणाऱ्या सर्वसामान्य जनतेला समजलेच पाहिजे. पुलाचे काम त्वरीत सुरू झाले नाही तर शिवसेना पुणे मनपा आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांना घेराव घालणार आहेत.
या आंदोलन प्रसंगी शहरप्रमुख संजय मोरे, उपशहरप्रमुख आबा निकम, सुनिल जगताप, सुरज मोराळे, महिला संघटिका विद्या होडे, युवती शहर अधिकारी शिवानी चौधरी, विभाग प्रमुख दिलीप व्यवहारे, बाबा कोरे, सोमनाथ गायकवाड, उपविभाग प्रमुख गिरीश गायकवाड,
तसेच दिनेश निकम, अमर देशमुख, तुषार सुर्वे, आकाश दुगम, पंकज मोहिते, सुरज घुले, स्वप्नील वसवे, पुणे उप शहर प्रमुख आबासाहेब निकम , युवासेना विधानसभा अधिकारी सोनू पाटील, प्रविण हिलगे, अंकित अहिरे, विकी धोत्रे, रेवन सुळ, संतोष होडे, राहुल शेडगे, बंडू नाना बोडके, रियाज शेख, शंतनू शेटे, प्रशांत जोशी, उगल मुगले, अरुण नंदू कोद्रे, आत्माराम देशमुख, संजय कदम, सतीश महाले, राम कदम, रोहित लोणकर, आदित्य पवार, महेश जाधव, ओंकार औताडे, किरण जाधव, गौरव गायकवाड, संजय सपकाळ, अजय सपकाळ, गजानन हरने, प्रवीण रणदिवे, परीशीत सिंग, गणेश मरळ, संतोष ढोरे, देवेंद्र तमायची आदी उपस्थित होते.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.