मातंग समाजाच्या न्यायाच्या लढ्याला नवी दिशा देण्यासाठी युवा नेते मा. तुषार तानाजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केली केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याशी चर्चा!
xtreme2day
09-07-2025 20:25:05
2766810
मातंग समाजाच्या न्यायाच्या लढ्याला नवी दिशा देण्यासाठी युवा नेते मा. तुषार तानाजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केली केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याशी चर्चा!

मुंबई (प्रतिनिधी) - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. रामदास आठवले यांची खास भेट घेऊन, त्यांच्या बांद्रा कार्यालयात प्रखर चर्चा पार पडली. महाराष्ट्रात सामाजिक न्यायासाठी आवाज बुलंद करत, मातंग समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी आज एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले!
या शिष्टमंडळाचे नेतृत्व सडेतोड आणि दूरदृष्टी असलेले युवा नेते मा. तुषार तानाजी कांबळे (महाराष्ट्र प्रदेश सचिव – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले – श्रमिक ब्रिगेड) यांनी अत्यंत ठामपणे केले.
या बैठकीत मांडण्यात आलेल्या प्रमुख मागण्या:
🔹 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती (१ ऑगस्ट) – शासकीय सुट्टी जाहीर करावी!
🔹 मातंग समाजासाठी स्वतंत्र योजनांची तात्काळ घोषणा व्हावी!
🔹 शिक्षण, नोकरी, आणि राजकीय प्रतिनिधित्वात विशेष संधी मिळाव्यात!
🔹 घरकुल, जमीन व आर्थिक मदतीच्या योजनांत स्पष्ट आरक्षण आणि न्याय मिळावा!
🔹 मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत थेट बैठक लवकरात लवकर आयोजित व्हावी!
मंत्री महोदयांनी या सर्व मागण्या अत्यंत गांभीर्याने घेतल्या असून, त्या मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोहोचवून सकारात्मक निर्णय घडवून आणण्याचे स्पष्ट आश्वासन दिले. “ही फक्त एक भेट नव्हे, तर मातंग समाजाच्या हक्क, अस्मिता आणि अस्तित्वासाठीचा निर्णायक क्षण आहे!” असे मा. तुषार तानाजी कांबळे यांनी सांगितले.
या शिष्टमंडळातील खालील प्रमुख उपस्थित मान्यवर होते.
अमर रिटे, अमोल रणदिवे, अनील लांडगे, मयुर रिटे, सचिन रणदिवे, विलास पाटोले, कैलास कांबळे, संतोष नाडे, सोमनाथ खंडागळे उपस्थित होते
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.