Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 पुणे ग्रामीण

फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज (एफसीआय) च्या वतीने एअर मार्शल प्रदीप बापट(निवृत्त) यांची मेस्कोवर संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार

xtreme2day   08-07-2025 18:06:30   4590592

फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज (एफसीआय) च्या वतीने एअर मार्शल प्रदीप बापट(निवृत्त) यांची मेस्कोवर  संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार

पुणे (प्रतिनिधी) - फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजने { एफसीआय } सोमवार ७ जुलै २०२५ रोजी एअर मार्शल प्रदीप बापट पीव्हीएसएम, व्हीएसएम { निवृत्त } यांच्या सन्मानार्थ स्वागत आणि अभिनंदन कार्यक्रम पुणे येथील हॉटेल ग्रँड शेरेटन आयोजित केला होता.

महाराष्ट्राच्या राज्यपालांनी एअर मार्शल प्रदीप बापट (निवृत्त) यांची महाराष्ट्र एक्स-सर्व्हिसमेन कॉर्पोरेशन लिमिटेड (मेस्को) च्या संचालक मंडळावर संचालक म्हणून नियुक्ती केली आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्षपद फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज (एफसीआय) चे अध्यक्ष शिव हरी हालन यांनी भूषवले आणि बेलराईज इंडस्ट्रीजच्या सुप्रिया बडवे ह्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.यावेळी एअर व्हाइस मार्शल नितीन वैद्य (निवृत्त),एअर कमोडोर अरुण इनामदार, ग्रूप कॅप्टन महाबळेश्वर देशपांडे,विनोद जैन, मुकुंद पुराणिक, विनोद बन्सल आणि विविध औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर तसेच अनेक ज्येष्ठ नागरिक,सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

उद्योजिका सुप्रिया बडवे यांनी भारतीय हवाई दलातील एअर मार्शल प्रदीप  बापट (निवृत्त) यांच्या गौरवशाली कारकिर्दीतून मिळालेल्या अनुभव आणि कौशल्याच्या समृद्धतेबद्दल थोडक्यात माहिती दिली. त्यांनी पुढे सांगितले की,सेवेतील त्यांच्या समर्पणामुळे आणि उत्कृष्टतेसाठीच्या त्यांच्या वचनबद्धतेमुळे त्यांना एअर मार्शलच्या सन्माननीय पदासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत असे सांगितले.

कृतज्ञतेचे प्रतिक म्हणून,फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज (एफसीआय) ने एअर मार्शल प्रदीप बापट ( निवृत्त) यांचा महाराष्ट्र आणि गोवाच्या पूर्व सैनिक परिषदेतील त्यांनी केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल आणि फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज (एफसीआय) ला त्यांनी दिलेल्या मौल्यवान पाठिंब्याचे वर्णन करणारे सन्मानपत्र,पुणेरी पगडी,शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

प्रसिद्ध रेखाचित्रकार मिलिंद रथकंठीवार यांनी एअर मार्शल प्रदीप बापट ( निवृत्त ) यांचे एक पोर्टेट चित्र त्यांना भेट दिले. 

एअर मार्शल प्रदीप बापट (निवृत्त) यांच्या  ह्या महामंडळावरील नियुक्तीमुळे विविध सर्व्हिसमधील माजी सैनिकांसाठी रोजगाराच्या संधी वाढतील अशी अपेक्षा आहे.

एअर मार्शल प्रदीप बापट (निवृत्त) यांनी सत्काराला उत्तर देताना माजी सैनिकांच्या सर्वकष कल्याणासाठी ही जवाबदारी मी स्वीकारली आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.व माजी सैनिकांकरिता यथाशक्ती अधिक काही करण्याचा पवित्र हेतू यावेळी व्यक्त केला.

 


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती