शिक्षणाबरोबर शाळेत मुलांवर संस्काराची गरज - प्रदीप नाईक
xtreme2day
04-07-2025 15:56:49
1287954
शिक्षणाबरोबर शाळेत मुलांवर संस्काराची गरज - प्रदीप नाईक
पुणे (प्रतिनिधी) - केशव माधव विश्वस्त निधी या संस्थेतर्फे कर्वेनगर परिसरातील अभिजात माध्यमिक शाळा, ज्ञानदा प्रशाला आणि सरस्वती विद्या मंदिर या शाळेतील इयत्ता दहावीमध्ये प्रथम आणि द्वितीय आलेल्या गुणवंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा,पालकांचा व वर्गशिक्षकांचा गुणगौरव सोहळा अभिजात माध्यमिक शाळा सोमवार दिनांक ३० जून रोजी संपन्न झाला.याप्रसंगी मएसोचे उपाध्यक्ष,कर्वे संस्था,वडगाव शेरी येथील व्हिजन स्कूलचे संस्थापक संचालक प्रदीप नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रदीप नाईक यांनी" राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या आयुष्यातील काही दाखले देत प्रत्येक विद्यार्थांनी यशाची शिखरे गाठत असताना माणूस म्हणून जगलं पाहिजे" तसेच कागदावरील गुणवत्ता खूप चांगली वाटते पण प्रत्यक्ष जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रमाची आवश्यकता असते.विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे व उत्तुंग यश मिळवावे "असा मौलिक सल्ला या वेळी विद्यार्थांना दिला.प्रदीप नाईक लिखित पाच पुस्तके तिन्ही शाळांना वाचनालयामध्ये सर्वांना वाचण्यासाठी भेट म्हणून दिली.याप्रसंगी अभिजात एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा अमला भागवत,सचिव सुप्रिया पालकर,मुख्याध्यापिका पूर्वा म्हाळगी,शैक्षणिक सल्लागार सुनील वाटवे,केशव माधव विश्वस्त निधीचे अध्यक्ष सदानंद भागवत,सचिव अरविंद देशपांडे,कविता शेंडे, त्याचबरोबर ज्ञानदा शाळेचे अध्यक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कर्वेनगरचे संघचालक उदयन पाठक,सचिव मनोज शेंडे,सरस्वती विद्यामंदिर शाळेचे अध्यक्ष राजेश भांडारकर,सचिव संध्या डबीर आदींची उपस्थिती होती.यावेळी पुढील विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक,१००१ रुपये रोख रक्कम,"जिद्दीची लोभस रूपं" हे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
अभिजात माध्यमिक शाळा
कु.समृद्धी सोलापुरे ९३.८०% कु.परमेश्वरी निकम -९२%श्रेयस कदम -९०.६०%विराज मालपोटे ८८.४०%
सरस्वती विद्या मंदिर
कु.तनुजा कांबळे ९०.८०% कीर्ती निंबाळे -८५%सक्षम खरात -९१.४०% तुषार कड -८९.८०%
अँड.डी.आर नगरकर(ज्ञानदा) प्रशाला
अनिकेत कोळी-८१.४०%अथर्व चव्हाण-७९.४०%कु.ऋतुजा पवार-८४.४०%कु.प्रियांका वाव्हुळे-८१%
तीनही शाळांच्या मुख्याध्यापक आणि १० वी वर्गशिक्षक यांचाही १००१ रुपये देऊन सत्कार करण्यात आला.
१.अभिजात माध्यमिक शाळा
वर्गशिक्षक–प्रमोद उमाप
मुख्याध्यापिका–पूर्वा म्हाळगी.
२. सरस्वती विद्यामंदिर वर्गशिक्षक–अर्चना शेडगे
मुख्याध्यापक किरण कोल्हे
३. ॲड.डी.आर.नगरकर (ज्ञानदा) प्रशाला
वर्गशिक्षक वैशाली साळुंके
मुख्याध्यापिका स्वाती कुलकर्णी.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी कुलकर्णी यांनी केले.आभार श्रद्धा पैठणकर यांनी मानले.सरस्वती वंदनेच्या वेळी अनिलखाडिलकर यांच्या शंख वादनाने प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते.सामूहिक पसायदान होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमास ज्ञानदा,पालकर,सरस्वती विद्यामंदिरचे कर्वेनगर मधील शिक्षक,पालक,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.