Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 रायगड

रायगडच्या शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाच्या केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी किसन जावळे

xtreme2day   01-07-2025 19:26:35   3178639

रायगडच्या शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाच्या केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी किसन जावळे   

 

अलिबाग (विशेष प्रतिनिधी) -- रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांचा अधिक अधिक लाभ घेऊन आपण व आपल्या कुटुंबाची आर्थिक उन्नती करावी आणि शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा असे आवाहन रायगडचे जिल्हाधिकारी श्री किसन जावळे यांनी केले.

 

 महाराष्ट्र शासनाच्या कृषी खाते व रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी खात्याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात वाडगाव ग्रामपंचायत येथे सांगितले. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी किसन जावळे, श्री सत्यजित बडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रा.जी. प., श्रीमती वंदना शिंदे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा रायगड, श्री महेश नारायण कर, कृषी विकास अधिकारी रायगड जिल्हा परिषद, डॉ. जयपाल पाटील, श्रीमती सारिका पवार सरपंच, श्री जयेंद्र भगत उपसरपंच आदी मान्यवर उपस्थित होते.

 

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांची प्रतिमा पूजन करण्यात आले, वदीप प्रज्वलन केले. पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत जिल्हा कृषी अधिकारी यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी रायगडचा कृषी विभाग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय उत्तम प्रकारे कार्य करीत असून त्यांना यांत्रिकीकरणाकडे जोडून घेण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती देऊन अंमलबजावणी करा असे आदेश दिले यावेळी उपस्थिततांना ड्रोनचे प्रात्यक्षिक श्रीमती स्वाती नागावकर यांनी दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून मधमाशा पालन कराव्यात व आर्थिक उन्नती करावी असे मार्गदर्शन शेतकरी श्री. रविंद्र पाटील यांनी केले.

 

यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देताना महिला शेतकऱ्यांसाठी 112 क्रमांकाचा महाराष्ट्र पोलिसांचा वापर कसा करावा, शेत आणि घरामध्ये साप विंचू जाऊ शकेला तर आणि अडचणीच्या बाळंतपणासाठी  108 रुग्णवाहिकेला बोलवावी. यासाठी रायगड जिल्हा 108 चे प्रमुख डॉक्टर श्री जगताप यांना दूरध्वनी करताच डॉक्टर अजित बर्गे पेण वरून पायलट पाटील सोबत पोहोचले त्यांनी 108 च्या बाबत माहिती दिली. बाळंतपणासाठी महिलेला नेण्यास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सूर्यवंशी यांना फोन करताच त्यांनी पेढांबे प्राथमिक आरोग्य केंद्रावरून 102 रुग्णवाहिका वाहन चालक श्री. स्वप्निल  पाटील हे घेऊन आले, विधान पासून संरक्षण घेण्यासाठी मोबाईलवर दामिनी ॲप डाऊनलोड करा, तर आपल्या सुरक्षेसाठी शेतात काम करताना कायम गंभूचा वापर करावा, व अधिक आपत्ती व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनासाठी मुंबई आकाशवाणी केंद्रावरून येत्या आठ जुलै रोजी सायंकाळी माझ्यावर माझे शेत अस्मिता वाहिनीवर कृषी कार्यक्रमातील मुलाखत कार्यक्रमाधिकारी श्रीमती संघमित्रा बरांडे यांनी घेतलेली ऐकावी असे उपस्थित शेतकऱ्यांना आपत्ती व्यवस्थापन तज्ञ प्राध्यापक डॉ. जयपाल पाटील यांनी सांगितले.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती