Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 पुणे शहर

मुळा - मुठा नद्यांमधील जलपर्णी विघटन करून नदी स्वच्छ करण्याच्या संयंत्राचे खा. मेघा कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन !

xtreme2day   27-06-2025 21:51:04   15678490

मुळा - मुठा नद्यांमधील जलपर्णी विघटन करून नदी स्वच्छ करण्याच्या संयंत्राचे खा. मेघा कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन !

पुणे (प्रतिनिधी) - शहरातील मुळा व मुठा नदीसह इतर मोठ्या जल स्त्रोतांमध्ये वाढती जलपर्णी ही भीषण समस्या आहे. या समस्येवर मात करण्यासाठी जलपर्णी नष्ट करून त्यापासून पोषक सेंद्रिय खत तयार करण्याची प्रणाली पुणे येथील पिनाक ग्रुपच्या श्री दिनेश चंद्रात्रे, डॉ. किर्ती दिनेश चंद्रात्रे व आर्किटेक्ट मैथिली चंद्रात्रे - शेट्टी यांनी विकसित केली आहे. 

 

प्रायोगिक तत्त्वावर उभारण्यात आलेल्या पाषाण तलाव येथील कंपनीच्या Organic Waste Composter (OWC) प्रकल्पाचे उद्घाटन खा. मेघा कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडले.

 

या प्रकल्पामुळे पाषाण तलाव येथील जलपर्णीची समस्या कमी खर्चात सुटणार असून पर्यावरण रक्षणासह पुणे महानगरपालिकेचा खर्च यामुळे वाचणार आहे.  जलपर्णी वर  प्रक्रिया करून त्याचे सेंद्रिय खत तयार केले जाते यात जैविक घटकांचे सेंद्रिय पद्धतीने विघटन करून त्याची घटक मूलद्रव्य अशा रीतीने मोकळी केली जातात वेगळी केली जातात ही परत झाडांना सहजपणे शोषून घेता येतील.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती