अंमली पदार्थांपासून दूर राहून, पुस्तके वाचण्याचे व्यसन लावा - डॉ. जयपाल पाटील
xtreme2day
26-06-2025 22:02:46
2828590
अंमली पदार्थांपासून दूर राहून, पुस्तके वाचण्याचे व्यसन लावा - डॉ. जयपाल पाटील

अलिबाग (प्रतिनिधी) - विद्यार्थ्यांनी प्रयत्नपूर्वक व्यसनापासून दूर राहावे, कोणीतरी सांगतो म्हणून व्यसनाधीन होऊ नये, यामुळे आपलं पुढील आयुष्य बरबाद होऊन जाते, यासाठी विद्यार्थ्यांनी व्यसन जरूर करावे ते पुस्तके वाचण्याची ज्यामुळे आपले नाव, गावाचे नाव आणि आई-वडिलांचे नाव रोशन होईल असे प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध वक्ते व आपत्कालीन व्यवस्थापन तज्ञ डॉ. जयपाल पाटील यांनी सांगितले.
अलिबाग पोलीस ठाणे, पी. एन. पी कॉलेज आणि महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय विभागाने वेश्वी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारार्थी प्रा. डॉ. जयपाल पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयात प्रमुख श्रीमती माधुरी पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर संविधानाचे वाचन करण्यात आले. यावेळी अलिबाग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. शरद शिंपणे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की मुलांनी व्यसनाधीन होऊ नये, त्यामुळे आपल्या अभ्यासावर, जीवनावर दुष्परिणाम होतात, याची काळजी विद्यार्थी जीवनात घ्यावी. असे सांगितले. यावेळी आपल्या मार्गदर्शनात डॉ. जयपाल पाटील यांनी सांगितले की, व्यसनापासून क्षणिक आनंद मिळतो पण त्याचे जीवनावर परिणाम होतात, फक्त व्यसन करणाऱ्या वर नसून त्याच्या कुटुंबीयांना परिणाम भोगावे लागतात, लग्नकार्यातल्या हळदी समारंभात काही ठिकाणी विशेष चिकन मटण मच्छी सोबत मद्यपान केले जाते, आणि घरी जाताना हलक डुलत अपघात दोन चाकी अथवा चार चाकी चा संभव असतो, अशावेळी इतरांनी मदत म्हणून रायगड जिल्हा पोलीस वाहतूक शाखेला दूरध्वनी करतात पोलीस हवालदार भायदे पोलीस कॉन्स्टेबल शिर्के हे दोघेही अल्कोहोल तपासणीचा यंत्र घेऊन पोहोचले, महिलांच्या सुरक्षेसाठी 112 क्रमांकावर फोन लावतात, अलिबाग पोलीस ठाण्याने यांच्यामार्फत महिला दामिनी पथक महिला पोलीस ढवाळे, महिला पोलीस ठाकूर यांना तातडीने पाठविले. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सर्व कर्मचारी, पीएमपी कॉलेजचे प्राचार्य व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मुले मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.