xtreme2day 18-06-2025 19:58:10 1760593
धार्मिक स्थळांच्या पर्यटनासाठी एसटीचा वापर करा - मंत्री प्रताप सरनाईक धार्मिक स्थळदर्शनासाठी टूर अँड ट्रॅव्हल यांच्या सहकार्याने एसटीची योजना! मुंबई (डॉ. जयपाल पाटील यांजकडून) - राज्यातील सर्वसामान्य जनतेला धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी यामध्ये प्रवास कमी खर्चात आणि निवास व भोजन व्यवस्था करण्यासाठी आता एसटी सोबत खाजगी टूर आणि ट्रॅव्हल यांनी संयुक्त सहली काढाव्यात अशी योजना केली असून तिचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी मुख्यालयात झालेल्या बैठकीत सांगितले. यावेळी मंत्री सरनाईक म्हणाले पंढरपूरच्या धर्तीवर सर्व तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाविकांना स्वच्छतागृह व निवास व्यवस्था निशुल्क करून देण्यात येईल. विशेषतः कमी गर्दीच्या हंगामाच्या वेळी व सुट्ट्यांच्या दिवशी प्रवाशांची संख्या कमी असते अशावेळी खाजगी टूर आणि ट्रॅव्हल यांनी धार्मिक स्थळांवर सहलींचे आयोजन करावे. यामुळे एसटीचे उत्पन्नही वाढेल. या सहली अष्टविनायक दर्शन, तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट, ज्योतिर्लिंग, त्र्यंबकेश्वर, नाशिक दर्शन अशा ठिकाणी धार्मिक सहलीचे आयोजन करावे. या उपक्रमाची सुरुवात श्रावण महिन्यापासून करावी अशा सूचना प्रशासनास दिल्या. या बैठकीस महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर सर्व खाते प्रमुख आणि टूर ट्रॅव्हल कंपन्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
936c3q