रायगड जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शने! 21 मे पासून उपोषणास बसणार!
xtreme2day
08-05-2025 08:22:09
674125
रायगड जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शने! 21 मे पासून उपोषणास बसणार!
अलिबाग ( प्रतिनिधी ) - येथून जवळ असलेल्या गोंधळपाडा गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भवन व सभागृह होण्यासाठी रायगड भूषण, आदिवासी सेवक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारार्थी यांच्या नेतृत्वाखाली रायगडातील अनुसूचित जाती व जमातीच्या नागरिकांवर आलेल्या आपत्तीबाबत दिवसभर जाहीर निदर्शने करून समारोपानंतर माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा न्याय दंडाधिकारी श्री संदेश शिर्के यांच्याकडे सादर केले.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की रायगड जिल्ह्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह गोंधळपाडा येथे बांधकाम केले होते. ते कंत्राटदाराने निकृष्ट बांधकाम केल्याने समाज कल्याणचे कार्यालय व इतर सहा कार्यालय तेथून स्थलांतरित करण्यात आली. आणि ती लाखो रुपये भाड्याने घेण्यात आली आहेत. ती थांबली गेली पाहिजेत, कंत्राटदारावर कारवाई झाली पाहिजे, सन 2006 च्या समाज कल्याण सह आयुक्तांवर कारवाई होऊन त्यांची पेन्शन थांबवली गेली पाहिजे, या सभागृहाचा वापर अनुसूचित जाती व जमातीच्या नागरिकांच्या मुला मुलींचे विवाह त्यांना व नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालय व इतर कार्यालयात जिल्ह्यातून कामासाठी आल्यावर अल्प किमतीत राहण्याची व्यवस्था होणे महत्त्वाचे आहे. अशा प्रमुख मागण्यांसाठी दिवसभर निदर्शने करण्यात आली.
येत्या 20 मे तारखेपर्यंत सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये दोन वर्षापासून अडकलेल्या फायलीची धूळ उडवून पडणारी इमारत तातडीने पाडावी व दोन्ही बांधकामे सुरू करावीत अन्यथा 21 मे पासून जिल्हाधिकारी रायगड कार्यालयासमोर त्यांच्यासोबत रायगडातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमी जनता देखील उपोषणास बसणार आहे.
आजच्या निदर्शनावेळी सकाळी 10 वाजता भारतीय बौद्ध महासंघाचे संघटक, माजी मुख्याध्यापक श्री. पांडुरंग मोरे आणि भारतीय बौद्ध महासभा अलिबाग शाखेचे कोषाध्यक्ष तथा निवृत्त पोलीस अधिकारी श्री जगन्नाथ मोरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सुरुवात केली. आजच्या निदर्शनाच्या वेळी श्री. धैर्यधर पाटील सेवानिवृत्त मुंबई क्रीडा अधिकारी, सौ वर्षा डोंगरे समाजसेविका खांदा पनवेल, सौ सप्तमी थळे, समाजसेविका अंतोरे पेण, श्री. विवेक म्हात्रे चेंढरे, श्री. युवराज निकाळे अलिबाग श्री प्रणय कदम, गोंधळ पाडा श्री संतोष शिंदे नवघर रामराज श्री रमाकांत पाटील सुळकोली श्री भास्कर गव्हाणे अध्यक्ष रायगड कृषक, महान, श्री निशांत गायकवाड गोंधळ पाडा श्री. बी. एन. महाले माजी ब्लॉक मिशन अधिकारी पनवेल उरण, श्री. सागर तानाजी शिनगारे, सामाजिक कार्यकर्ते आंबेडकरी चळवळ, पुणे श्री. एम. व्ही. कदम सेवानिवृत्त नायब तहसीलदार,एडवोकेट अजय उपाध्ये अलिबाग, श्री राकेश धनाजी पाटील उपसरपंच कार्ले अलिबाग, विकास रणपिसे प्रेस फोटोग्राफर श्री अशोक गायकवाड कर्जत, श्री विनय ठाकूर,श्री. अनिल गावडे गोंधळ पाडा असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.