xtreme2day 08-04-2025 17:17:38 1534386
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा होणार अलिबाग (डॉ. जयपाल पाटील यांजकडून) - अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व वंचित दुर्बल घटकातील व्यक्तींच्या सर्वांगीण विकासा चे ध्येय साध्य करण्यासाठी शासनाकडून विविध कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी म्हणून दिनांक 8 एप्रिल ते 14 एप्रिल पर्यंत सामाजिक समता सप्ताह साजरा होणार असल्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रायगड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. यामध्ये मंगळवार दिनांक 8 एप्रिल2025 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमाचे उद्घाटन करणे व पत्रकार परिषदेचे आयोजन करून सदर कार्यक्रमाची जनतेला माहिती देणे मंगळवार दिनांक 8 एप्रिल ते सोमवार 14 एप्रिल भारतीय संविधानाची उद्देशिका प्रस्ताविका याचे वाचन करून भारतीय जनतेत संविधाना विषयी जनजागृती निर्माण करणे. बुधवार दिनांक 9 एप्रिल विभागातील सर्व शाळा महाविद्यालय शासकीय वसतिगृह येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित वकृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा लघुनाथ्य स्पर्धा इत्यादी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करणे. गुरुवार दिनांक 10 एप्रिल समता दूतामार्फत ग्रामीण व शहरी भागात पथनाट्य लघु नाटिका याद्वारे सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत जनतेचे प्रबोधन करणे. तसेच सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्यामार्फत मार्जिन मनी योजनेअंतर्गत कार्यशाळा आयोजित करणे शुक्रवार 11 एप्रिल रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करणे तसेच महात्मा फुले यांच्या जीवनात सामाजिक कार्याविषयी वक्ता बोलावून कार्यक्रमाचे आयोजन करणे. शनिवार दिनांक 12 एप्रिल संविधान जागर भारतीय संविधानाविषयी सर्वसाधारण माहिती देणे यामध्ये संविधानाची निर्मिती संविधान निर्मिती समिती अनुच्छेद विशेषता मूलभूत अधिकार व मूलभूत कर्तव्य या विषयी व्याख्यान आयोजित करणे, सहायक आयुक्त समाज कल्याण या कार्यालयात महिला मेळावा आयोजित करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेल्या कार्याबद्दल माहिती देणारे व्याख्यान आयोजित करणे रविवार दिनांक 13 एप्रिल रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबिर व त्यांचा मेळावा आयोजित करणे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय शासकीय वसतिगृहे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करणे त्याचबरोबर स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी व अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमधून स्वच्छता अभियान राबविणे.सोमवार दिनांक 14 एप्रिल जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन व इतर कार्यक्रम व्याख्याने चर्चासत्र इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करणे सदर कार्यक्रमास लोकप्रतिनिधींना निमंत्रित करणे जिल्हास्तरावर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण स्वाभिमान मेळावा आयोजित करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याबद्दल माहिती सांगणारे व्याख्यान आयोजित करणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालया तो ऑनलाइन प्रमाणपत्र सादर करणे सायंकाळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे समारोप करावा अशी माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय रायगडच्या कार्यालयीन प्रमुख श्रीमती माधुरी पाटील यांनी माहिती दिली.
d78qrd