Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 रायगड

राजश्री शाहू प्रतिष्ठान शिरूरच्या सल्लागारपदी प्राध्या. डॉ. जयपाल पाटील यांची नियुक्ती!

xtreme2day   20-03-2025 19:09:24   657969

राजश्री शाहू प्रतिष्ठान शिरूरच्या सल्लागारपदी प्राध्या. डॉ. जयपाल पाटील यांची नियुक्ती!

 अलिबाग (प्रतिनिधी) - पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या राजश्री शाहू प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष भगवान रामचंद्र श्रीमंदिलकर यांनी अलिबागचे आपत्ती व्यवस्थापन तज्ञ, प्रगतिशील शेतकरी, आणि समाजसेवक प्रा. डॉ. जयपाल पाटील यांची दिनांक 7 मार्च रोजी झालेल्या प्रतिष्ठानच्या कार्यकारणी मध्ये नियुक्ती केल्याचे पत्र  दिले आहे.

 यामध्ये ते म्हणतात सामाजिक न्याय शिक्षण शाश्वत विकास आणि ग्रामीण उन्नती या क्षेत्रात राजश्री शाहू महाराजांच्या विचारानुसार कार्य करणाऱ्या राजश्री शाहू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संस्थेची स्थापना सन 2014 मध्ये करण्यात आली मागील 10 वर्षापासून संस्था  शिक्षण पर्यावरण संवर्धन कृषी आदिवासी विकास आणि सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे.

 आपण आपत्ती व्यवस्थापन तज्ञ, प्रगतिशील शेतकरी आणि समाजसेवक म्हणून समाजासाठी अतुलनीय कार्य केले आहात, विशेषतः सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी,  आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रभावी उपाययोजनांसाठी, आणि आदिवासी व वंचित समाजाच्या विकासासाठी आपले कार्य उल्लेखनीय आहे.

 आपल्या कार्याची महाराष्ट्र शासनाने दखल घेत गुणवंत कामगार, उत्कृष्ट पत्रकार, आदिवासी सेवक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन गौरव केला आहे. आपली पद्मश्री 2024 साठी माननीय पंतप्रधान कार्यालय निवडी पर्यंत प्रगती झाली होती हेही आम्हाला अभिमानास्पद आहे,  महाराष्ट्र पोलिसांनी चुकीच्या पाठवलेल्या अहवालामुळे  निवड होऊ शकली नाही याचे दुःख आहे. तुमच्या मौल्यवान ज्ञानाचा आणि अनुभवाचा लाभ संस्थेसाठी अमूल्य ठरेल ग्रामीण भागातील सक्षमीकरण, आपत्ती व्यवस्थापन व पर्यावरण पूरक जीवनशैली आणि सामाजिक न्याय या क्षेत्रात आपले मार्गदर्शन आम्हाला महत्त्वाचे ठरेल त्यामुळे आपणास राजश्री शाहू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या सल्लागार पदावर नियुक्ती करीत आहोत. आपल्या अमूल्य मार्गदर्शनामुळे संस्थेच्या सामाजिक उपक्रमांना अधिक बळ मिळेल आपणही नियुक्ती स्वीकृत करून संस्थेच्या कार्यात आपले योगदान द्यावे अशी विनंती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भगवान रामचंद्र  श्री. मंदिलकर म्हणून करीत आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती