Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 पुणे शहर

गायीच्या आणि म्हशीच्या दूधाच्या किंमतीत पुण्यातील कात्रज डेअरीकडून १५ मार्चपासून वाढ

xtreme2day   13-03-2025 20:36:48   1098855

गायीच्या आणि म्हशीच्या दूधाच्या किंमतीत पुण्यातील कात्रज डेअरीकडून १५ मार्चपासून वाढ

 

पुणे (प्रतिनिधी) - पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कात्रज डेअरीमध्ये ही बैठक पार पडली. या बैठकीत दूधाच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार, गायीच्या दूधाच्या किंमतीत 2 रुपयांनी वाढ केली जाणार आहे. त्यामुळे गायीच्या दुधाची किंमत 56 वरून 58 रुपये इतकी केली जाणार आहे. तसेच म्हशीच्या दुधाच्या किंमतीतही २ रुपयांनी वाढ होणार आहे. त्यामुळे म्हशीच्या दुधाची किंमत 72 वरून 74 रुपये इतकी होणार आहे.

 

सध्या महागाई गगनाला भिडली आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यातच सध्या भाजीपाला, फळं यांचेही दर वाढताना दिसत आहे. त्यातच आता सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना आता दूधासाठी 2 रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत. कारण दूध उत्पादक संघाकडून गायीच्या आणि म्हशीच्या दूधाच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाचे मानद सचिव प्रकाश कुतवळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, २ रुपयांप्रमाणे दरवाढीचा निर्णय एक मताने झाला आहे. सध्याच्या महागाईच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. हे वाढीव दर येत्या १५ मार्चपासून लागू करण्यात येणार आहेत.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती