जीवनात प्रगती साधायची असेल तर पत्नीची साथ कायम ठेवा-- प्राध्यापक जयपाल पाटील
xtreme2day
13-03-2025 17:25:48
235928
जीवनात प्रगती साधायची असेल तर पत्नीची साथ कायम ठेवा - प्राध्यापक जयपाल पाटील

कर्जत (प्रतिनिधी) - येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार लेखक कवी तालुक्यात पहिलाच मराठी चित्रपट कुणब्याचं पोर काढणारे एडवोकेट गोपाळ शेळके यांच्या लग्नाचा 48 वा वाढदिवस श्री समर्थ विवाह मंगल कार्यालय किरवली येथे संपन्न झाला, यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे रायगड भूषण प्राध्यापक जयपाल पाटील, उद्योजक प्रभाकर शेळके, एडवोकेट गोपाळ शेळके व सौ प्रमिला वहिनी उपस्थित होत्या.
यावेळी प्राध्यापक जयपाल पाटील म्हणाले की आपण आपल्या जीवनात मार्गक्रमण करताना समजा चुकून रस्त्यात पडलो वाटच चालताना आपण एकटेच असतो त्यातील अनेक जण पाहून हसतात आणि पुढे जातात मात्र एखादाच धावत येतो आणि मदत करतो. असा कर्जत तालुक्यातील वृत्तपत्र क्षेत्रात पहिले साप्ताहिक काढणारा सर्व क्षेत्रात मदत करणारा, आमचा मित्र ज्याला मी देव माणूस म्हणतो तो एडवोकेट गोपाळ शेळके होय आणि त्याला सर्वतोपरी मदत करणारी आमच्या वहिनी सौ. प्रमिला यांच्यामुळेच एडवोकेट गोपाळ जगभर प्रसिद्ध झाले आहेत त्या रखुमाईला माझे वंदन असो, जीवनात प्रगती साधायची असेल तर पत्नीची साथ कायम ठेवा असे मार्गदर्शन शेळके कौटुंबिक मेळाव्यात सांगितले.
प्रारंभी लग्न वाढदिवस निमित्त कुटुंबीयांसमवेत केक कापण्यात आला यावेळी गोपाळ शेळके यांनी आपल्या जीवनातील लग्नाची संपूर्ण माहिती यावेळी देऊन मला आणि माझ्या कुटुंबीयांना सर्वतोपरी माझ्या सौभाग्यवतीने सांभाळणे असून त्यामुळे माझे संपूर्ण कुटुंब एकत्रित आहे. मी कर्जत तालुक्यात पहिला माझा सामाजिक मराठी चित्रपट कुणब्याचं पोर जगभर प्रसिद्ध झाला आहे, आणि दुसरा चित्रपट वकिलाच्या लग्नाची गोष्ट या नावे काढण्याचा संकल्प आज मी करीत आहे.
यावेळी उद्योजक प्रभाकर शेळके म्हणाले दादा आणि वहिनींच्या मदतीमुळे आमच्या आई-वडिलांची उणीव भासली नाही आम्ही सारे भाऊ दादांच्या मार्गदर्शना मुळेच मोठे झाले आहोत, त्यांनी त्यांचे ज्ञान आणि मार्गदर्शन वापरून आमच्या कुटुंबात अनेक वकील, उच्चशिक्षित तयार केले आहेत. यावेळी एडवोकेट सतीश शेळके एडवोकेट कल्पना शेळके आणि कुटुंबातील लहान थोर यांनी मनोगत व शुभेच्छा दिल्या. यावेळी कुटुंबीयांनी मोठ्या प्रमाणात विविध भेटवस्तू दिल्या यामध्ये प्रा. जयपाल पाटील यांनी विलोभनीय विठ्ठल रखुमाई ची मूर्ती सर्वांचे लक्षवेधीत होती. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन एडवोकेट गोपाळ शेळके यांची मुलगी एडवोकेट भारती ढाकवळ हिने केले, तर आभार एडवोकेट सतीश शेळके यांनी मानले.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.