Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 रायगड

प्रजापिता ब्रह्माकुमारी अलिबाग केंद्रात शिवजयंती साजरी!

xtreme2day   26-02-2025 16:29:09   1718412

प्रजापिता ब्रह्माकुमारी अलिबाग केंद्रात शिवजयंती साजरी!     

  अलिबाग (प्रतिनिधी) - प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या अलिबाग केंद्रामध्ये ८९ मी शिवजयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमास प्रमुख पाहुणे रायगडच्या जेलचे प्रमुख श्री व सौ अशोक कारकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष रायगड भूषण प्राध्यापक जयपाल पाटील डॉक्टर संतोष वाघमोडे केंद्रप्रमुख भारतीय दीदी आदी मान्यवर उपस्थित होते.

 

कार्यक्रमाची सुरुवात प्रारंभी शिवबाबांची भजन गीताने होऊन कुमारी शरण्या संतोष वाघमोडे, शाल्मली  संतोष वाघमोडे या भगिनींनी स्वागत गीताचे बहारदार नृत्य बहारदार सादर केले. नंतर पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून भारती दीदी ने फुलांचे गुच्छ व ओम शांतीचे प्रतीक देऊन स्वागत केले छोट्या मुलांच्या हास्य शिवबाबांच्या वाढदिवस केक कापण्यात आला यावेळी जेलर श्री अशोक कारकर यांनी शिवजयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन आपले ओम शांती बद्दल अनेक अनुभव कथन केले यामध्ये अमरनाथ यात्रेचे खास दर्शनाबाबत माहिती दिली डॉक्टर संतोष वाघमोडे व श्रीमती कारकर यांनी आपले अनुभव कथन केले.

 

शिवजयंती बाबत अनमोल विचार भारती दीदी यांनी सांगितले. आपले अध्यक्षहीय भाषणात प्राध्यापक जयपाल पाटील यांनी सूर्यनारायणापासून सोलर चा वापर प्रत्येकाने करावा याची सुरुवात माउंट अबू राजस्थान येथे केली. एक शेतकरी म्हणून मी हा प्रकल्प पाहिला व अनुभवला व आपल्या देशातील राजकीय नेत्यांनी याचा वापर करावा अशी मागणी तेथे झालेल्या पत्रकार संमेलनानंतर प्रजापतीच्या दूरदर्शन केंद्राने घेतलेल्या मुलाखतीत मी मागणी केली होती त्याची अंमलबजावणी देशाचे आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर उद्घाटन प्रसंगी आयोध्या मध्ये यास सोलर योजनेची अंमलबजावणी देशभरात केली आहे. त्यामुळे बाबांची सोच व माननीय पंतप्रधानांनी केलेली अंमलबजावणी जनतेच्या हिताची आहेच. शिवजयंतीच्या निमित्ताने आपणही आपल्या घरावर शेतामध्ये या सोलर योजनेची अंमलबजावणी करा असे त्यांनी सांगितले. यानंतर केंद्राच्या खालील बाजूस श्रीफळ वाढवून ध्वजवंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजू दीदी हिने केले आभार प्रदर्शन व्यवस्थापकीय अधिकारी डहाके यांनी मानले.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
🔐 You have received 1 message(-s) # 160520. Go >>> https://graph.org/GET-BITCOIN-TRANSFER-02-23-2?hs=c08df5fc846f60bb9396dd96bc2512ee& 🔐 26-02-2025 17:04:04

pyfihw


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती