xtreme2day 03-02-2025 20:28:52 7896584
मराठवाडा विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र असा पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता ; जायकवाडीत सोडण्यात येणाऱ्या हक्काच्या पाण्यासाठी मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी आक्रमक ! छत्रपती संभाजी महाराज नगर (विशेष प्रतिनिधी) -येत्या काळात मराठवाडा विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र असा पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता आहे. जायकवाडीत सोडण्यात येणाऱ्या हक्काच्या पाण्यासाठी मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळालं पाहिजे, यासाठी मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी आणि उद्योजकांकडून चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. दरम्यान यावेळी संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी आपली भूमिका मांडत, मराठवाड्याला हक्काचं पाणी देताना कुचराई करू नका, विखे पाटील असो किंवा अजून कुठले नेते, त्यांना विनंती आहे की, तुम्ही महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहात, कुठल्या एका भागाचं नाही. जर तुम्ही हक्काच्या मागणीला विरोध करत असाल तर आम्हाला तुमचा विरोध करावा लागेल, असा इशारा पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना दिला आहे