Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 पुणे शहर

शिवसेना नेते स्व काका वडके यांना श्रध्दांजली

xtreme2day   29-01-2025 20:50:05   2778608

शिवसेना नेते स्व काका वडके यांना श्रध्दांजली !

 

पुणे (प्रतिनिधी) - शिवसेनेच्या स्थापनेपासून हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या वाढीसाठी सतत झटणारे पुण्यातील स्व काका वडके यांच्या २५ व्या स्मृतिदिनानिमित्त काकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

स्व.काका वडके यांचे सोबत पुणे शहरात काम केलेले जेष्ठ शिवसैनिक रामभाऊ पारिख, आनंदा ओव्हाळ, आशुतोष मोकाशी, दिलीप गालिंदे, तानाजी गोरे, विजय शेलार, संजय बोडके, दिलीप पोमण, दिपक शिंदे, रविंद्र वडके, सतीश वडके, मकरंद पेठकर, किशोर रजपूत यांनी जुन्या आठवणी जाग्या केल्या. त्याकाळातील जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी केलेली विविध प्रकारची आक्रमक आंदोलन असतील. काकांचा वक्तशीरपणा असेल. त्यांच कडक भाषेतील मार्गदर्शन असेल आणि सर्वात महत्वाचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वेळोवेळी काका वडके यांनी मार्गदर्शन केले आहे. काकांनी जपणूक केलेला जुन्या वर्तमानपत्रांच्या कात्रणांचा संग्रह आजही मार्गदर्शक ठरतो. काकांनी गोरगरीबांविषयी असलेली करूणा कायम स्मरणात राहण्यासारखी आहे. त्यांच्याबाबत असलेली आस्था आजच्या पिढीला मार्गदर्शक ठरेल.

त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, मा गटनेते अशोक हरणावळ, शहर संघटक राजेंद्र शिंदे उमेश वाघ रमेश शिरसागर गौरी चव्हाण विभाग प्रमुख चंदन साळुंखे मुकुंद चव्हाण परत थोरात अनिल जाधव उन्मेश रणधीर सचिन चिंचवडे रुपेश पवार रमेश जुनवणे अमरदीप म्हेत्रे नागेश खडके राजेंद्र सिंह राजपूत जुबेर तांबोळी नरेंद्र सिंह ठाकुर ज्ञानंद कोंढरे बकुळ दाखवे तुषार भोकरे उपस्थित होते.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
📆 You got a transaction from our company. Continue =>> https://telegra.ph/Get-BTC-right-now-01-22?hs=0277431bbf7215262fdf613dc54f1647& 📆 01-02-2025 20:49:54

8vzizb


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती