xtreme2day 26-01-2025 22:49:19 1436938
जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांना उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार ! ठाणे (डॉ. जयपाल पाटील यांजकडून) - ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाचे अभ्यास व कर्तृत्ववान माहिती अधिकारी मनोज सानप यांना आज प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यात उत्कृष्ट अधिकारी म्हणून उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. ठाण्याचे जिल्हाधिकारी श्री.अशोक सिनगारे,पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे हे उपस्थित होते.महाराष्ट्र राज्याच्या मंत्री कुमारी आदिती तटकरे यांनी रायगड जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केल्यानंतर यावेळी रायगड जिल्हा माहिती अधिकारी म्हणून श्री मनोज सानप हे होते. त्यावेळीही त्यांनी जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य केले होते. त्यांचा संपर्क महाराष्ट्रात अनेक सरकारी अधिकाऱ्यांशी उत्तम प्रकारे असल्याने ते सर्व सरकारी कर्मचारी व पत्रकारांना नेहमी मदत करत असतात. याची संघटनेने नोंद घेतली. यावेळी ते म्हणाले या यशात माझे सर्व वरिष्ठ अधिकारी, सहकारी अधिकारी कर्मचारी तसेच प्रसारमाध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचाही मोलाचा वाटा आहे. आपल्या सर्वांच्या मार्गदर्शन, सहकार्याशिवाय हे शक्य नव्हते.याचबरोबर माझ्या कुटुंबियांची मला आजपर्यंत मिळालेली "खंबीर साथ, त्यांचा त्याग" आणि आपल्या सर्वांचा आशिर्वाद, शुभेच्छा मी कधीही विसरू शकत नाही. मी आपल्या सर्वांचाच कायम ऋणी आहे. असं त्यांनी सांगितले.