स्वारगेट बसस्टँडवर भटक्या कुत्र्याचा सुळसुळाट ; सोलापूरच्या प्रवाशी महिलेचे तोडले लचके !
पुणे (प्रतिनिधी) - स्वारगेट बस स्टँडवर एका महिला प्रवाशाला सौ. प्रमिला कांबळे वय 40 वर्षे यांना एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला.
रात्री उशिरा 10. 46 च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. अत्यंत भयानक पध्दतीने हा चावा असल्याने 40 वर्षीय ही महिला प्रवासी खुपच घाबरली आणि तिच्यावर आलेल्या आक्रमक पवित्रा घेतलेल्या या कुत्र्याला तीने अनेकदा दूर करण्यासाठी प्रयत्न केला पण तो कुत्रा या महिलेची पोटरी सोडण्यास तयार नव्हता. शेवटी अनेक प्रवासी मदतीला धावून आले आणि त्यामुळे तो कुत्रा पळून गेला.
दरम्यान, रात्री उशिरापर्यंत ही महिला व तिच्या सोबत असणारे नातेवाईक स्वारगेट बस स्टँड वर बसून होते, त्यांनी सांगितले की आम्ही आमच्या गावात उपचार करून घेऊ.