'चला करू मतदान' या पथ-नाट्य द्वारे कर्वेनगर येथे मतदान जनजागृती अभियान
xtreme2day
14-11-2024 16:44:51
2567998
'चला करू मतदान' या पथ-नाट्य द्वारे कर्वेनगर येथे मतदान जनजागृती अभियान
पुणे (प्रतिनिधी) - येत्या २० नोव्हेंबर ला राज्यात सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमध्ये नागरिकांच्या मतदानाचा टक्का वाढावा व मोठ्या प्रमाणात नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे यासाठी कर्वेनगर व कोथरूड भागातील विविध ठिकाणी येथील 'चला करू मतदान' हे पथ-नाट्य सादर करण्यात आले.
सुप्रसिद्ध नाट्यकर्मी कुलदीप धुमाळे नाट्य संहिता लिखित व दिग्दर्शित,केशव माधव न्यास आयोजित *चला करू मतदान* हे पथ नाट्य कर्वेनगर, कोथरूड,एरंडवणे परिसरातील नागरिकांसमोर विविध मोक्याच्या ठिकाणी तसेच विविध महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारा समोर एकूण ४० ठिकाणी सादर करण्यात आले.
यावेळी नवमतदार असलेल्या तरुणाईला,मतदानाचा हक्क न बजावणाऱ्या मतदारांना मतदानाचे महत्व पटवून देण्यासाठी व त्यांना मतदान करण्याची प्रेरणा देण्यासाठी पथनाट्य द्वारे जनजागृती करण्यात आली. तसेच उपस्थित मतदारांना मतदान करण्याबाबत शपथ देखील देण्यात आली.
कुलदीप धुमाळे यांचे बरोबर डॉ सतीश जोशी,सुभाष फडके,एअर मार्शल प्रदीप बापट (निवृत्त), निवृत्त विंग कमांडर अविनाश मुथाळ,निवृत्त एअर कमोडेर अरुण इनामदार,श्रीकांत पुराणिक,मोहन मोने,अरविंद देशपांडे,प्रकाश देशपांडे,प्रशांत कुलकर्णी,रमेश खेडकर,भालचंद्र खेनट,संजय वळसंगकर,नंदकुमार कुलकर्णी,सुरेंद्र प्रधान,नरेंद्र प्रधान,उल्हास सावळेकर नंदाजी भागवत,प्रकाश दांडेकर,रमेश बर्वे,अनंत गौतम,पद्माकर करमाळकर,प्रमोद कुलकर्णी ह्यांनी सहभाग नोंदवला.ह्या सर्वांनी शंभर टक्के मतदान करा,नोटा मतदान करू नका,योग्य उमेदवाराला मतदान करा,मतदार राजा असल्याने सजग राहून विचारपूर्वक, कोणाच्याही दबावाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे,मतदाराने स्वयंस्फूर्तीने मतदानाला बाहेर पडावे,लोकशाहीचे हात बळकट करावे असे फलक हातात धरले होते.
अश्याच प्रकारचे पथनाट्य नवसह्याद्री क्रीडा संकुल,श्रीराम चौक,कमिन्स महाविद्यालय चौक,गुळवणी महाराज रोड,सहवास चौक,कुलश्री कॉलनी चौक,मधुसंचय गणपती चौक,ताथवडे उद्यान समोर,शामाप्रसाद मुखर्जी उद्यान समोर,अलंकार दत्त मंदिर,विठ्ठल मंदिर समोर अश्या विविध चौकामध्ये,गर्दीच्या वेळेस ५० ठिकाणी सादर करण्यात आले.अजून विविध सोसायट्या मध्ये,सेवा वस्त्यांमध्ये ५१ ठिकाणी पथनाट्य द्वारे मतदान जनजागृती करण्याचा निर्धार असल्याचे केशव माधव न्यास चे सचिव अरविंद देशपांडे ह्यांनी सांगितले. हे पथनाट्य बघण्यासाठी व ऐकण्यासाठी यावेळी नागरिकांनी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.या वेळी उपस्थित नागरिकांना शंभर टक्के मतदान करण्याचे केशव माधव न्यासचे वतीने आवाहन करण्यात आले.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.