Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 पुणे शहर

विधानसभा निवडणुकीकरीता जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार निवारण व मतदार मदत कक्ष कार्यान्वित

xtreme2day   23-10-2024 23:25:39   5896588

विधानसभा निवडणुकीकरीता जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार निवारण व मतदार मदत कक्ष कार्यान्वित

 

पुणे (प्रतिनिधी) - महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार निवारण व मतदार मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून या कक्षाचा टोल फ्री क्रमांक १९५० असा आहे.

 

या कक्षात मतदारांना मार्गदर्शन करण्यासोबतच तक्रारी स्वीकारण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांना कक्षाच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करता येईल. तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पुढील कार्यवाहीकरीता तात्काळ पाठविण्यात येते. या कक्षाकडे दूरध्वनीद्वारे नवीन मतदान ओळखपत्र, ओळखपत्रात दुरुस्ती, मतदार यादीत नावनोंदणी, ऑनलाइन पद्धतीने ओळखपत्र काढताना येणाऱ्या अडचणीबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा नियत्रंण कक्षाच्या समन्वय अधिकारी ज्योती कावरे यांनी दिली आहे.

 

निवडणूक खर्च निरीक्षकांची माध्यम कक्षाला भेट

 

पुणे, दि. २३: पुणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघांसाठी नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या माध्यम संनियंत्रण व जनसंपर्क कक्षाला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. 

 

विविध विधानसभा मतदार संघांसाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून सुमीत कुमार, प्रेम प्रकाश मीना, उमेश कुमार, अमीत कुमार आणि ए.वेंकादेश बाबू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी दिलेल्या भेटीप्रसंगी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सुहास दिवसे, पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर,  जिल्हा माहिती अधिकारी तथा माध्यम कक्ष समन्वय अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, सहायक संचालक जयंत कर्पे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्र विद्या विभागाचे सहायक प्राध्यापक योगेश बोराटे उपस्थित होते.

 

यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी माध्यम कक्षाच्या कामकाजाविषयी माहिती दिली. माध्यम कक्षात सुमारे १० दूरचित्रवाणी संचांच्या माध्यमातून वृत्तवाहिन्यांतील निवडणूक प्रचार, जाहिरात, पेड न्यूज आदींच्या अनुषंगाने संनियंत्रण केले जात आहे. तसेच वृत्तपत्रातील बातम्या, मजकूर, तसेच सोशल मीडियावरील पोस्टबाबतही काटेकोर लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक प्रकरणात कारवाई करण्यात येते, असे डॉ. दिवसे म्हणाले.

 

डॉ. ठाकूर यांनी माध्यम कक्षातर्फे तयार करण्यात येणाऱ्या विविध अहवालांची माहिती दिली. वृत्तपत्रातील जाहिराती आणि पेड न्यूजबाबतही वृत्तपत्रांचे अवलोकन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

 

सहायक प्राध्यापक बोराटे यांनी सोशल मिडीयाद्वारे करण्यात येणाऱ्या प्रचारावर तसेच सोशल मिडीयावरील जाहिराती व त्याचा खर्च यावर माध्यम कक्षातर्फे ठेवण्यात येणाऱ्या नियंत्रणाच्या कामकाजाची माहिती दिली.

 

माध्यम कक्षाच्या कामकाजाबाबत निवडणूक खर्च निरीक्षकांनी समाधान व्यक्त केले.

 

निवडणूक खर्च निरीक्षक सुमीत कुमार यांच्याकडे २००- इंदापूर, २०१-बारामती, २०२-पुरंदर व २०३-भेार विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. श्री.मीना यांच्याकडे २०४-मावळ, २०५-चिंचवड, २०६-पिंपरी, २०७-भोसरी मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. श्री.उमेश कुमार यांच्याकडे २१२-पर्वती, २१३-हडपसर, २१४-पुणे कँन्टोन्मेंट व २१५-कसबा पेठ मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. श्री.अमीत कुमार यांच्याकडे २०८-वडगांव शेरी, २०९-शिवाजीनगर, २१०-कोथरुड व २११-खडकवासला मतदारसंघाची तर श्री.बाबू यांच्याकडे १९५-जुन्नर, १९६-आंबेगाव, १९७-खेड आळंदी, १९८-शिरुर व १९९-दौंड मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

 


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
🔧 Email; You got a transfer №EQ38. VERIFY > https://telegra.ph/Go-to-your-personal-cabinet-08-25?hs=52dfbb7145041b74f43561ca448e4d5d& 🔧 11-11-2024 05:22:44

navjlo


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती