Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 रायगड

पिंपळपाडा येथे सेनादलाचे कबड्डी प्रशिक्षण शिबिर संपन्न

xtreme2day   23-10-2024 23:17:07   784989

पिंपळपाडा येथे सेनादलाचे कबड्डी प्रशिक्षण  शिबिर संपन्न

पेेण ( डाॅ.जयपाल पाटील यांजकडून) - सेनादलाच्या वीरमराठा रेजिमेंटच्या कबड्डी सराव शिबिर रायगड जिल्ह्यातील  पेण तालुक्यातील पिपंळपाडा येथे घेण्यात आले. न्युयंग संघ पिपळपाडा यांच्या क्रिडांगणावर या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 या शिबीराच्या  सांगता समारंभाप्रसंगी न्यूयंग संघ पिपळपाडा संघाने सेना दलाच्या  संघाचा सत्कार केला. या वेळी जेएसडब्ल्यू कंपनीचे अधिकारी पेण तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हरिचंद्र शिंदे,कराटे, किकबॉक्सिंगचे आंतराष्ट्रीय खेळांडु किकबॉक्सिंग पंच प्रविण पाटील, सेनादल संघाचे प्रशिक्षक राष्ट्रीय प्रशिक्षक तथा रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे  सदस्य लक्ष्मण गावंड, न्यू यंग संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्ता पाटील,  न्यू यंग संघाचे अध्यक्ष विकास पाटील,खजिनदार सुनिल पाटील, उपाध्यक्ष गजानन पाटील  सरचिटणीस हरिश्चंद्र पाटील, कासु ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सुनंदा गांवड,राष्ट्रीय कबड्डी पंच हिरामण भोईर, योगेश पाटील, योगेश टेमकर , धावपटू गजानन भोईर, महेंद्र पाटील, आकाश पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

 रायगड ही कबड्डीची पंढरी मानली जाते रायगड जिल्ह्याने अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळांडू दिले तर राष्ट्रीय प्रशिक्षक दिले रायगडच्या कबड्डीचे आकर्षण सगळ्यानाच असते अनेक राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन रायगड जिल्ह्यात केले जाते. सेनादलाच्या विर मराठा रेजिमेंट, बीकानेर-राजस्थान या संघाचा सराव शिबिरासाठी सेना दलाने देखील रायगगड जिल्ह्याची निवड केली. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पिपंळपाडा येथे सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

    हे शिबिर न्यूयंगसंघ पिपंळपाडा संघाचा कबड्डी खेळांडू सध्या सेनादलात कार्यरत असलेला प्रदिप भगत यांनी वीरमराठा रेजिमेंट संघाचे सराव शिबिर घेण्याचे ठरविले  येथील क्रिडांमंडळाच्या सदस्यांनी व ग्रामस्थांनी या खेळांडूना क्रिडांगण उपलब्ध करुन दिले.  तर खेळांडुच्या राहाण्याची व सर्व व्यवस्था केली. 

     या संघाला प्रशिक्षण देण्यासाठी रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय प्रशिक्षक लक्ष्मण गांवड यांची निवड करण्यात आली.  लक्ष्मण गांवड हे अनुभवी प्रशिक्षक असल्याने त्यांनी या संघाला उत्तम प्रकारे प्रशिक्षण देण्याचे काम केले  बिकानेर येथे होणाऱ्या सेनादलाच्या कबड्डी स्पर्धेमधे हा संघ सहभागी होणार असून या संघासोबत लक्ष्मण गांवड प्रशिक्षक तर सहाय्यक प्रशिक्षक म्हणून न्यू यंग संघाचे तथा पोलीस दलातील नंदकुमार पाटील हे असणार आहेत.  या गोदर लक्ष्मण गांवड यांनी 2010 ला फिरोजपुर पंजाब येथे या संघाला प्रशिक्षण दिले आहे त्यावेळी लक्ष्मण गांवड यांना सेनादलाने आर्मी कॅप देवून सन्मानित केले होते.

    सेनादलाच्या वीरमराठा रेजिमेंटच्या संघाला दोन वेळा प्रशिक्षण देण्याची संधी मिळाली.  या संघामधे चांगले खेळाडू आहेत खेळांडूनी चांगली मेहनत घेतलीच आहे तर न्युयंग संघ पिपळपाडा संघाने या सराव शिबिरासाठी चांगले सहकार्य केले आहे. यावर्षी बिकानेर येथे होणाऱ्या सेनादलाच्या कबड्डी स्पर्धेमध्ये हा संघ चांगली कामगिरी करुन अंतिम विजेतेपद मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आसल्याचे  वीरमराठा रेजिमेंटचे प्रशिक्षक लक्ष्मण गांवड यांनी सांगितले.

या वेळी जेएसडब्ल्यू कंपनीचे अधिकारी पेण तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हरिचंद्र शिंदे,कराटे, किकबॉक्सिंगचे आंतराष्ट्रीय खेळांडु किकबॉक्सिंग पंच प्रविण पाटील, सेनादल संघाचे प्रशिक्षक राष्ट्रीय प्रशिक्षक तथा रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे  सदस्य लक्ष्मण गावंड, न्यू यंग संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्ता पाटील,  न्यू यंग संघाचे अध्यक्ष विकास पाटील,खजिनदार सुनिल पाटील, उपाध्यक्ष गजानन पाटील  सरचिटणीस हरिश्चंद्र पाटील, कासु ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सुनंदा गांवड,राष्ट्रीय कबड्डी पंच हिरामण भोईर, योगेश पाटील, योगेश टेमकर , धावपटू गजानन भोईर, महेंद्र पाटील, आकाश पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

   या  सराव शिबीरास न्यू यंग संघाचे अध्यक्ष विकास पाटील यांनी ऊत्तम सहकार्य केले. तसेच संघाचे खेळाडू नंदकुमार पाटील, दुर्वास पाटील, गजानन पाटील, विजय भगत सतिष पाटील तसेच अन्य वरिष्ठ खेळाडुंनी शिबीरात ऊत्तम मार्गदर्शन केले.आम्ही जे सुखाने जगतो ते तुमच्या मुले सेनादलाने येथे कबड्डीचा सराव शिबिराचे आयोजन आमच्या पिपंळपाडा गावात केले हे आमचे भाग्य आसल्याचे न्युयंगसंघ पिपंळपाडा संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्ता पाटील. यांनी या वेळी सांगितले.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती