चेंढरे ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत डॉ.जयपाल पाटील सन्मानित
xtreme2day
15-10-2024 21:35:28
796945
चेंढरे ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत डॉ.जयपाल पाटील सन्मानित
अलिबाग (प्रतिनिधी) - सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षा साठीचे धडे देण्यासाठी जगभरात 500 हून अधिक व्याख्याने देणारे चेंढरे ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून राहणारे ग्रामस्थ रायगड भूषण डॉ.जयपाल पाटील चेंढरे ग्रामपंचायतीचे भूषण आहेत, त्यांचे प्रशिक्षण सर्वांच्या उपयोगाचे आहे याचा मला अभिमान आहे असे विचार ग्रामपंचायतचे प्रशासक श्री. ज्ञानेश्वर साळगावकर यांनी पंचायतीच्या विशेष ग्रामसभेत काढले.
यावेळी ग्रामसेवक श्री. निलेश पाहून यांनी उपस्थित ग्रामस्थांना सांगितले की डॉ. जयपाल पाटील यांनी पंचायतीच्या सर्व कर्मचारी व ग्रामस्थांना दोन वर्षांपूर्वी आपत्ती व सुरक्षेचे प्रशिक्षण दिले असून त्यांना महाराष्ट्र शासनाने आदिवासी सेवक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले असून हे दोन्ही पुरस्कार अलिबाग तालुक्यात प्रथमच त्यांना मिळाले आहेत आणि ते आमचे ग्रामस्थ आहेत यासाठी त्यांचा ,साळावकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात येत आहे यानंतर प्रा. डॉ. जयपाल पाटील यांनी ग्रामस्थ व कर्मचारी यांना सांगितले की पावसाळा आता संपत आला असून जोरदार वीजा गडगडात होत आहे त्यामुळे अपघात होऊन नुकसान होते या वीजांची माहिती मिळण्यासाठी केंद्र सरकारने दामिनी ॲप तयार केला असून आपल्या मोबाईलवर तो मोफत डाउनलोड करून घ्यावा, इतरांनाही सांगावा असे त्यांनी यावेळी आवाहन केले
जयपाल पाटील यांनी या विशेष सत्कारबद्दल ग्रामपंचायत व अधिकारी यांना धन्यवाद दिले. आजच्या सभेत अनेक विकास कामांना मंजुरी दिल्याची माहिती उपस्थित त्यांना प्रशासक यांनी दिली सर्वांनी स्वच्छता पाळावी व सार्वजनिक कामे पंचायतीला सादर करावेत असे श्री. साळगावकर यांनी सांगितले, यामधे यावेळी श्री. शिरीष पाटील,श्रीहरी खरात, सौ. संध्या पालकर, श्री संदेश गोसावी श्री. संदीप शहा, श्री. अनिल जावकर, श्री. संजय जगे, श्री अरुण देसाई, धनश्री पाटील, रूपाली आंबिटकर यांनी चर्चेत सहभाग घेतला यानंतर सर्वांचे आभार ग्रामसेवक निलेश गांवड यांनी मानले.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.