Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 सातारा

शेतकऱ्यांची वीज बिलं आम्ही माफ केली, येत्या १० दिवसात शेतकऱ्यांना मागचे बिल झीरो आणि आताचे बिल झीरो येणार- अजित पवार

xtreme2day   03-10-2024 20:18:24   5437693

शेतकऱ्यांची वीज बिलं आम्ही माफ केली, येत्या १० दिवसात शेतकऱ्यांना  मागचे बिल झीरो आणि आताचे बिल झीरो येणार- अजित पवार

सातारा (डाँ.जयपाल पाटील यांजकडून) - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आज ७५ वर्षे पूर्ण झाली. या बँकेची कामगिरी अतिशय चांगली असून बँक यापूढेही अशीच चालत राहो, कुणाची दुष्ट लागू नये अशी इच्छा यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केली. या बँकेला शंभरहून अधिक पुरस्कार मिळाले आहेत, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. असे देखील यावेळी अजित पवार यांनी नमूद केले. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीकोनातून या बँकेची स्थापना करण्यात आली. शेतकऱ्यांची वीज बिलं आम्ही माफ केली.

 

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. च्या वतीनं आयोजित अमृत महोत्सव सांगता सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आज सहभागी झाले. यावेळी उपस्थितांना त्यांनी संबोधित केलं. या बँकेला शंभरहून अधिक पुरस्कार मिळाले आहेत, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. असे देखील यावेळी अजित पवार यांनी नमूद केले. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीकोनातून या बँकेची स्थापना करण्यात आली. शेतकऱ्यांची वीज बिलं आम्ही माफ केली. शेतमालाला चांगला भाव देण्याचा प्रयत्न कायम करत आलो. दुधावर प्रतिलिटर ७ रुपये अनुदान आम्ही देऊ केलं आहे. अशी माहिती यावेळी अजित पवार यांनी दिली. 

 

येणाऱ्या १० दिवसात तुमचे मागचे बिल झीरो ,आणि आताचे बिल झीरो आणि येणार आहे. अशी ग्वाही यावेळी अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिली.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती