xtreme2day 03-10-2024 20:01:37 1778691
लोकप्रिय कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांना अटक ; रस्ता बेकायदेशीररित्या खोदल्याचा आरोप ! पुणे (प्रतिनिधी) - लोकप्रिय कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांना रस्ता बेकायदेशीररित्या खोदल्याचा आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील म्हाळुंगे येथील पोलिसांनी त्यांना आणि त्यांच्या नातेवाईकाना ताब्यात घेतले आहे. चैतन्य महाराज यांनी त्यांच्या इतर दोन भावांसह आणि इतर साथीदारांसह घराच्या जवळ असणारा रस्ता JCBने बेकायदेशीरपणे खोदल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. या प्रकरणी चैतन्य सयाजी वाडेकर, अमोल सयाजी वाडेकर, प्रमोद सयाजी वाडेकर आणि ऋषिकेश शशिकांत सूर्यवंशी यांना अटक करण्यात आली आहे. मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चैतन्य महाराज वाडेकर म्हाळुंगे परिसरात राहतात. त्यांच्या घराजवळ एक कंपनी आहे. त्या ठिकाणापासून जाणाऱ्या रस्त्यावरून त्यांचे वाद आहेत. बुधवारी रात्री कंपनीत जाणारा रस्ता त्यांनी बेकायदेशीर खोदला. यावेळी त्यांचे इतर काही साथीदार आणि दोन भाऊ होते, असं तक्रारीत म्हटलं आहे. तसेच कंपनीच्या कंपाउंडचे पत्रे देखील काढले आहेत. या प्रकरणी कंपनीचे व्यवस्थापक अजित पाटील यांनी म्हाळुंगे पोलिस स्थानकात तक्रार दिली आहे. या प्रकरणी म्हाळुंगे पोलिसांनी चैतन्य सयाजी वाडेकर, अमोल सयाजी वाडेकर, प्रमोद सयाजी वाडेकर आणि ऋषिकेश शशिकांत सूर्यवंशी यांना अटक केली आहे. चैतन्य महाराज वाडेकर हे नेहमीच सोशल मीडियावर कमालीचे अॅक्टीव्ह असतात. ते रिल्स देखील बनवतात. त्यांचे सोशल मीडियावर लाखो फॅन्स आहेत. त्यांच्या या अटकेमुळे त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. या प्रकारामुळे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारे चैतन्य महाराज चांगले चर्चेत आले आहेत.