Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 रायगड

पावसाळ्यात आदिवासी भागातील लोकांनी सतर्क राहावे - डॉ. जयपाल पाटील

xtreme2day   25-08-2024 20:12:01   67990

पावसाळ्यात आदिवासी भागातील लोकांनी सतर्क राहावे - डॉ. जयपाल पाटील

 

खालापूर (प्रतिनिधी) - शासनाने आपले गाव दरडग्रस्त म्हणून जाहीर  केल्यानंतर ग्रामस्थांनी तहसीलदार  यांच्याकडून  नोटीस  येऊन घर -गोठ्यास पर्यायी जागा दिली जाते तेथे निघुन जाणे म्हणजे आपली जीवित, वित्त हानी टाळण्यास मदत होऊन आपल्या  कुटुंबावर आपत्ती येणार  नाही असे मार्गदर्शन ग्रामपंचायत बीडखुर्दने अदिवासी वाडीवरील प्राथमिक शाळेतील सभागृहात रायगड भूषण डॉ.जयपाल पाटील यांनी सांगितले.     

 

मात्र ज्यावेळी लोक भाज्या  शोधण्यासाठी डोंगरावर जातात. अशावेळी डोंगराला कुठे चीर गेलेली दिसली. त्यामुळे गावावर मोठे संकट येऊ शकते. याची माहिती लागलीच आपल्या आदिवासी समाजाचे सरपंच  भाऊ पवार आहेत त्यांना दिलीच पाहिजे. ते त्वरेने शासनाकडे कळवतील असेही आपत्ती शिबिरात रायगड भूषण डॉ. जयपाल पाटील यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर ग्रामपंचायतचे सरपंच भाऊ पवार, मुख्याध्यापिका संगिता गवळी,शिक्षक  सुनील  महामुणकर   ग्रामसेवक श्री.महेश म्हसे हे उपस्थित होते.
 
आपली ही पूर्वांपार घरे आहेत. मात्र गावांमध्ये नव्याने कोणी डोंगराला  लागून व नदीकिनारी खाजगी जमीन अथवा सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून उन्हाळ्यात घर बांधीत असेल त्याची माहिती गावचे कोतवाल,तलाठी अथवा ग्रामसेवक यांना देणे महत्त्वाचे आहे. तेथे कोणालाही  घरे बांधून देऊ नयेत. ज्यामुळे त्यांच्यावर आपत्ती येऊ शकते. याबाबत देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्याकडे दरडग्रस्त व पूरग्रस्त गावांबाबत घरे बांधण्यास मज्जाव करावा अशी मागणी डॉ.जयपाल पाटील यांनी केलेली आहे. त्यामुळे जनतेची जीवित व घरादारांची गुराढोरांची हानी होते, ती थांबविली जाईल. या पावसाळ्यात लहान मुलांना विजेची बटणे बंद अथवा चालू करण्यास सांगू नयेत. अचानक नदीला पूर आला तर आपण जेथे आहात तेथे थांबावे. आपल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच व आपत्तीव्यवस्थापन  समिती सदस्य यानां फोनवरून सांगावे. गावातील माणसाने घर सोडून जाऊ नये. साप विंचू दोष झाल्यास घेण्याची काळजी, बाळंतपणासाठी महिलेला रुग्ण रुग्णालयात नेण्यासाठी 102 रुग्णवाहिकेचा वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिक दिले.  महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलिसांचा 112 क्रमांकाचा वापर कसा करावा, महिलांनी घरातील गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी पण नैसर्गिक आपत्ती आली तर शासनाकडून आर्थिक मदत कशी व किती होते. याची माहिती डाॅ.जयपाल पाटील यांनी दिली.
 
यावेळी अँड. गोपाळ शेळके यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी असलेले कायदे व केंद्र सरकारने नवीन केलेल्या कायद्यांची माहिती यावेळी दिली.अपघात प्रसंगी 108  व महिलांना  बाळंतपणासाठी नेण्यास रुग्ण वाहीकेचा वापर कसा करावाचे या कार्यपद्धतीची माहीती दिली.शेवटी आभार ग्रामसेवक श्री. महेश म्हसे यांनी मानले.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती