Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 रत्‍नागिरी

फेक न्यूज मुळे समोरच्याचे जीवन उध्वस्त करतोय का? याचा विचार करा- पालकमंत्री उदय सामंत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड पत्रकारांसाठी कार्यशाळा संपन्न.

xtreme2day   05-08-2024 13:38:52   2778672

फेक न्यूज मुळे समोरच्याचे जीवन उध्वस्त  करतोय का? याचा विचार करा- पालकमंत्री उदय सामंत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड पत्रकारांसाठी कार्यशाळा संपन्न

 

रत्नागिरी (डॉ. जयपाल पाटील यांजकडून) -  पत्रकारांच्या लेखणीमुळे आम्हा समाज सेवकांना. दिशा सापडते. माणूस म्हणून. अवधनाने चुका होतात. याबाबत पत्रकारांनी कान टोचले तर भविष्यात चुका न घडता कार्य करण्यास उमेद मिळते आणि यामुळे राजकारणात आम्ही नामांकित होतो. याचे मोठे श्रेय पत्रकारांना आहे असे मी समजतो. समाज माध्यमांवर येणाऱ्या फेक न्यूज मुळे समोरच्याचे जीवन उध्वस्त करतोय का याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे, असे मार्गदर्शन माहिती व जनसंपर्क कोकण विभागीय कार्यालय रत्नागिरी जिल्हा माहिती केंद्राद्वारे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड जिल्ह्यातील 100 पत्रकारांना आयोजित केलेल्या कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी. राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड रत्नागिरीचे, पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

 

पालकमंत्री यांनी मराठी पत्रकारितेचे जनक, आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यशाळेला सुरुवात झाली. प्रारंभी कार्यशाळेबाबत उपसंचालक डॉक्टर गणेश मुळे यांनी प्रास्ताविक केले. व्यासपीठावर उपसंचालक डॉक्टर गणेश मुळे, सेवानिवृत्त उपसंचालक सतीश लळीत, रायगडच्या जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे, रत्नागिरीचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, राज्य अधिस्वीकृती समिती सदस्य जानवी पाटील. कोकण विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्ष उमेश तोरसकर, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे, सिंधुदुर्ग इलेक्ट्रॉनिक फोरमचे अध्यक्ष राजू नाईक, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद चापेकर, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मेहरून नाकाडे ज्येष्ठ पत्रकार दत्ता महाडिक आदी उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले की, पत्रकारांना अन्य साधारण महत्त्व आहे. जिल्ह्याचा कोकणचा व आपल्या गावाचा विकास हे पत्रकारांच्या कायम डोक्यात असते. रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड. तळ कोकणातील पत्रकारांनी. नव्या तंत्रज्ञान. नुसार काम केले पाहिजे. समाज माध्यमातून फेकन्येरीटेव मधून राजकीय जीवन उध्वस्त होऊ नये. याची कायम काळजी. घेतली पाहिजे. समाज माध्यमावर मोबाईल वर काहीही टाईप करून समोर पाठवायचे. त्यानी अधिक टाकून पुढे देणे मग ते चांगले असो अथवा वाईट  असो याची पर्वा केली जात  नाही कारण  त्याला  संहिता नाही त्यामुळे  एखाद्याचे जीवन उध्वस्त होऊ शकते. याचा कामगिरी आणि प्रत्येकाने विचार केला पाहिजे. तसेच पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी. शासन स्तरावर. विविध समित्या कार्यरत असून. त्यांचा पाठपुरावा केला जाईल. कोकणातील पत्रकारांनी कोकणच्या विकासासाठी अजून काय बदल करावेत याविषयी व सरकार जनतेसाठी. करीत असलेल्या योजनांची प्रसिद्धी अधिक करावी.असे ना.उदय सामंत यांनी सांगितले.सेवानिवृत्त उपसंचालक श्री ललित यांनी आर्टिफिशियल, इटलीजन्स. समाज माध्यम आणि. फेक न्युज. सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. विकसित तंत्रज्ञानाचा योग्य वापर. आजच्या युगात पत्रकारांनी केला पाहिजे. असे सांगितले. यावेळी उपस्थित पत्रकारांशी. कधी स्वीकृती. पत्रकार. पत्रकारांना घरे. पत्रकारांवर होणारे हल्ले. याविषयी पत्रकारांनी. पालकमंत्री महोदयांबरोबर चर्चा केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रायगड जिल्हा माहिती अधिकारी. मनीषा पिंगळे यांनी मानले. कार्यक्रमानंतर. रत्नागिरी शहरातील केलेल्या व सुरू असलेल्या भव्य,दिव्य विकास कामे, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे निवासस्थान,तारांगण, शासकीय मेडिकल कॉलेज, छत्रपती राजे संभाजी स्मारक,थिबा पॅलेस येथे सोबत पालकमंत्री,ना.उदय सांमत यांनी दिली.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती