xtreme2day 27-07-2024 19:45:46 436861
डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठा चे माननीय कुलगुरू प्राध्यापक डॉ. कारभारी विश्वनाथ काळे यांना संरक्षण मंत्रालय भारत सरकार, कडून मानद कर्नल पदवी अलिबाग (डॉ.जयपाल पाटील यांजकडून) - बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉ. कारभारी विश्वनाथ काळे यांना मानद कर्नल पदवी जाहीर झाली असून सदरचा (पीपिंग) पदग्रहण सोहळा , प्रतिष्ठेची असलेली मानद कर्नल पदवी प्रदान कार्यक्रम सोहळा सोमवार दिनांक 29 जुलै 2024 रोजी दुपारी १२:१५ मिनिटांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या पेक्षागृहात आयोजित केला असून ही पदवी प्रदान करण्यासाठी विशिष्ट सेवा पदक मिळवले (vsm) अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगिंदर सिंग यांच्या प्रमुख हस्ते व कार्यकारी परिषद विद्या परिषद तसेच विद्यापीठातील सर्व विभाग प्रमुख,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थिती करण्यात येणार आहे रायगडाला अत्यंत अभिमानास्पद बाब म्हणजे संपूर्ण देशातून 19 विद्यापीठांच्या कुलगुरूंची निवड करण्यात आली असून त्यातून महाराष्ट्रातील गोरेगाव रायगड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉ. कारभारी विश्वनाथ काळे यांची निवड करण्यात आली आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ हे महाराष्ट्र राज्याचे प्रथम तंत्रशास्त्र विद्यापीठ असून या विद्यापीठाला अभियांत्रिकी फार्मसी वास्तुशास्त्र हॉटेल मॅनेजमेंट व केटरिंग टेक्नॉलॉजी चे सुमारे 340 महाविद्यालये संलग्नित आहेत.विद्यापीठाचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर व संलग्नित महाविद्यालय विद्यापीठ तसेच शिक्षण क्षेत्रातून कुलगुरू प्राध्यापक डॉ. कारभारी काळे यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.