Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 पुणे ग्रामीण

आळंदीत चांदीचा पालखी रथ ओढण्याचा २५ वर्षानंतर कुऱ्हाडे कुटुंबियांना बैलजोडीला मान !

xtreme2day   11-06-2024 19:22:15   2198754

आळंदीत चांदीचा पालखी रथ ओढण्याचा २५ वर्षानंतर कुऱ्हाडे कुटुंबियांना बैलजोडीला मान !

 

श्रीक्षेत्र आळंदी (विशेष प्रतिनिधी) - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी आळंदी नगरीत सुरू आहे. या वैभवशाली पालखी सोहळ्यासाठी यंदा माऊलींचा चांदीचा पालखी रथ ओढण्याचा मान आळंदीच्या कुऱ्हाडे कुटुंबियांच्या हौश्या आणि बाजी या बैलजोडीला मिळाला आहे.

 

कुऱ्हाडे कुटुंबंयांची ही तिसरी पिढी आहे, ज्यांना यंदाच्या पालखी सोहळ्या मान मिळाला आहे. यंदा बैलजोडीच्या मानासाठी आळंदी गावातील कुऱ्हाडे परिवाराकडून ७ अर्ज आले होते. त्यापैकी कुऱ्हाडे घराण्यातील सहादू बाबुराव कुऱ्हाडे यांच्याकडील असणाऱ्या बैलजोडीला हा मान मिळाला आहे. बाजी आणि हौश्या अशी या बैलजोडीचे नाव आहे. तब्बल २५ वर्षानंतर हा मान कुऱ्हाडे कुटूंबियांना मिळाला आहे. हा मान मिळाल्याने कुऱ्हाडे परिवारात आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान ही बैलजोडी माऊलींच्या पालखी रथासोबत आळंदी ते पंढरपूर आणि पंढरपूर ते आळंदी असा प्रवास करणार असून त्यासाठी नियमित बैलजोडीचा सराव देखील सुरू असल्याचं कुऱ्हाडे कुटुंबीयांनी म्हटलं आहे. ''यंदाच्या वर्षी आम्हाला हा मान मिळाल्याने जीवनाचे सार्थक झाले'' असल्याचे सहादू कुऱ्हाडे यांनी सांगितले.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती