Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 अहिल्यादेवी नगर

महामेट्रो सुसाट…! बोगद्यातून स्वारगेटपर्यंत धावण्याचा मुहूर्त सप्टेंबर महिन्यात ठरला !

xtreme2day   07-06-2024 17:56:24   198899

महामेट्रो सुसाट…! बोगद्यातून स्वारगेटपर्यंत धावण्याचा मुहूर्त सप्टेंबर महिन्यात ठरला !

पुणे (विशेष प्रतिनिधी) - पुण्यातील महामेट्रो सुसाट धावत असून पुणेकरांनी आपल्या दैनंदिन जीवनात स्थान दिले आहे! वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते शिवाजी नगर नंतर आता बोगद्यातून स्वारगेटपर्यंत धावण्याचा मुहूर्त सप्टेंबर महिन्यात ठरला आहे, ही आनंदाची बातमी आहे ! 

 

दरम्यान, पिंपरी-चिंचवड ते जिल्हा न्यायालय मार्ग पुढे स्वारगेटपर्यंत जाणार आहे. या भूमिगत मार्गाचे काम सुरू असून, तो सप्टेंबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. हा मार्ग ३.६४ किलोमीटरचा आहे, अशी माहिती महामेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनावणे यांनी दिली.
 
पुणे मेट्रोच्या रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मार्गाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या विस्तारित मार्गामुळे मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ होत आहे. जानेवारीच्या तुलनेत प्रवासी संख्येत मे महिन्यात सुमारे ९ लाखांची वाढ झाली आहे. यामुळे मेट्रोची सरासरी दैनंदिन प्रवासी संख्या आता ९० हजारांवर पोहोचली आहे. दरम्यान, स्वारगेटपर्यंत मेट्रो धावण्यासाठी सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
 
रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मेट्रो मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे ६ मार्चला केले. तेव्हापासून मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ होत आहे. विस्तारित मार्ग सुरू होण्याआधी मेट्रोची प्रवासी संख्या जानेवारी महिन्यात १७ लाख ५५ हजार, फेब्रुवारीत १७ लाख ७६ हजार होती. विस्तारित मार्ग सुरू झाल्यानंतर मार्चमध्ये प्रवासी संख्या २२ लाख ५८ हजारांवर गेली. त्यानंतर प्रवासी संख्येतील वाढ कायम राहून ती एप्रिलमध्ये २३ लाख ८१ हजार आणि मेमध्ये २६ लाख १६ हजारांवर पोहोचली आहे. 
 
मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या जानेवारी महिन्यात सुमारे ६० हजार होती. रामवाडीपर्यंत विस्तारित मार्ग सुरू झाल्यानंतर दैनंदिन प्रवासी संख्या ९० हजारांवर पोहोचली आहे. विस्तारित मार्ग सुरू होण्याआधी मेट्रोचे दैनंदिन उत्पन्न सुमारे १० लाख रुपये होते. आता मेट्रोचे दैनंदिन उत्पन्न १४ लाख रुपयांवर पोहोचले आहे. मे महिन्यात मेट्रोला एकूण ४ कोटी २४ लाख ७६ हजार ४८० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
 
सध्या पुणे मेट्रोची सेवा पिंपरी-चिंचवड ते जिल्हा न्यायालय आणि वनाज ते रामवाडी या दोन मार्गांवर सुरू आहे. वनाझ ते रामवाडी मार्गावरील रुबी हॉल ते रामवाडी हा विस्तारित टप्पा मार्चमध्ये सुरू झाला. त्यावर बंडगार्डन, येरवडा, कल्याणीनगर आणि रामवाडी ही स्थानके आहेत. हा मार्ग ५.५ किलोमीटरचा आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
MOPcTBBy 21-12-2024 02:29:39


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती