xtreme2day 12-05-2024 15:38:20 944053
एकमेकांना पाण्यात पाहू नका ; एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या राजकीय वादाबाबत रावेर लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांचं वक्तव्य जळगाव (विशेष प्रतिनिधी) - ज्येष्ठ नेते एकनाथराव म्हणजे नाथाभाऊ हे माझे कौटुंबिक सदस्य असले, तरी मधल्या काळात ते राष्ट्रवादीत होते. निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली आणि आता ते माझ्यासाठी पूर्ण ताकदीने काम करत आहेत. गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांनी सोबत काम करणं या क्षेत्रासाठी चांगले आहे. त्यांनी एकमेकांवर टीका करणे, एकमेकांच्या विरोधात काम करणं आमच्यासारख्या नव्या पिढीसाठी7 चांगले नाही, असे वक्तव्य रावेर लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी केले आहे. आम्हाला विजयाचा पूर्ण विश्वास आहे. दोन्ही कार्यकाळात आम्ही भक्कम काम केलंय, म्हणून मतदार यंदाही आशीर्वाद देतील. मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. रावेरमध्ये 65 टक्के मतदान झाले पाहिजे. संविधानाने दिलेल्या मतदानाचा अधिकार प्रत्येकाने बजवावा, असे त्यांनी म्हटले. माझ्यासाठी नाथाभाऊ पूर्ण ताकदीने काम करीत आहेत निवडणूक कोणतीही असो, सर्वांचे सहकार्य आवश्यक असते. नाथाभाऊ माझ्या कुटुंबाचे सदस्य असले तरी ते मधल्या काळात राष्ट्रवादीत गेले होते. मात्र निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी भाजपमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली आणि आता ते माझ्यासाठी या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने काम करत आहेत. नाथाभाऊंचा पक्षप्रवेश केव्हा होईल हे तेव्हाही नाथाभाऊंनी सांगितलेलं नव्हते. मीडियानेच फक्त अंदाज बांधले होते. निवडणुकीपूर्वी ते बोलले की मी भाजपमध्ये येणार आहे. आता पक्ष संघटना आणि नेतृत्व त्याबद्दल निर्णय घेतील. दरम्यान, देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटलांचा माझ्या भाजप प्रवेशाला विरोध नाही, त्यांची नाराजी आता दूर झाली आहे असं एकनाथ खडसे म्हणाले. माझा भाजपमध्ये प्रवेश होणार हे खुद्द विनोद तावडेंनी घोषित केल्यामुळे मी निश्चिंत आहे असं खडसे म्हणाले.