Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 छत्रपती संभाजी नगर

चौथ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस - छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय घडामोडींना वेग ; इम्तियाज जलील यांनी नवनीत राणा यांच्याबद्दल केले आक्षेपार्ह टिपणं

xtreme2day   11-05-2024 20:20:50   984654

चौथ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस -  छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय घडामोडींना वेग ;  इम्तियाज जलील यांनी नवनीत राणा यांच्याबद्दल केले आक्षेपार्ह टिपणं

 

छत्रपती संभाजी नगर  (प्रतिनिधी) - माझ्या नजरेत अतिशय चीप दर्जाची महिला म्हणजे नवनीत राणा आहे. प्रसिद्धीसाठी ती कोणत्याही पातळीला जाऊ शकते. स्वतःच्या पब्लिसिटीसाठी मंदिरात न जाता उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा वाचायची म्हणत होती. 10 मिनिटे कॅमेरासमोर तुला दाखवतो असं म्हणाल्यास ती 10 मिनिटे एकटी नाचेल. तिला इथं प्रचाराला बोलावलं. भाजपाला कोणीतरी भूंकणारं हवं आहे. अमरावतीवरून हे पार्सल आणलं आहे आता त्यांची मेहफिल सजेल, असा हल्लाच एमआयएम चे उमेदवार इम्तियाज जलील यांनी आज प्रचाराच्या तोफा थांबल्यावर चढवला.

 

एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी आणि भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांच्यातील कलगीतुरा अधिकच वाढला आहे. आता या कलगीतुऱ्यात एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी उडी घेतली आहे. जलील यांनी नवनीत राणा यांच्यावर जोरदार हल्ला केला. दरम्यान, असदुद्दीन ओवैसी यांनी त्यांचा छोटा भाऊ अकबरुद्दीन ओवैसी यांची स्तुती केली होती. माझा छोटा भाऊ हा तोफ आहे, असं ओवैसी म्हणाले होते. त्यावर नवनीत राणा यांनी पलटवार केला होता. अशा तोफा आम्ही घराच्या बाहेर सजावटीसाठी ठेवतो, असं प्रत्युत्तर नवनीत राणा यांनी दिलं होतं. मोठा म्हणतोय छोटा खतरनाक आहे. पण आम्ही असे खतरनाक घरात पाळतो. याद राखा मी एका सैनिकाची लेक आहे, असा इशाराही नवनीत राणा यांनी दिला होता.
 
हा हल्ला करताना त्यांची जीभ घसरली. तुम्ही दारूचे दुकान उघडले म्हणून दारूच्या बाटल्या दाखवल्या. निवडणुकीचं चिन्ह दारूची बॉटल ठेवायला पाहिजे होती. प्रचाराला दोनशे दोनशे रुपयांमध्ये आले होते हे मलाही माहीत आहे. बिचारे दोनशे रुपये घेऊन प्रचाराला येणाऱ्या लोकांना दोनशे रुपयात घोषणा द्यायची म्हणून आणले होते. मात्र त्यांना हे माहीत नव्हते की दोनशे रुपयात दांडेपण खावे लागतील, असा टोला इम्तियाज जलील यांनी विरोधकांना लगावला.

 

शिवसेना म्हणते मोदीला हरवायचं आहे. आम्हाला इथ जिंकायचं. असं कसं चालेल? मी निवडणूक जिंकून नरेंद्र मोदी यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलणार आहे. तळवे चाटण्यामुळे तुमचे अस्तित्व संपले. एकेकाळी म्हणायचे औरंगाबाद हा शिवसेनेचा गड आहे. पण आपण हा गड उचलून टाकला. 2024 ला देशातील सर्वात मोठा जश्न आम्ही करणार.10 असे राज्य आहेत जिथं भाजपने एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिले नाही.उद्या तुमची नक्कीच वाजवणार, असा इशाराच त्यांनी दिला.

 

प्रचारादरम्यान राडा 

 

इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गट आणि महायुतीचे कार्यकर्ते आमने-सामने. कार्यकर्ते समोरासमोर आल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी परस्पराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्याच बरोबर ठाकरे गटाकडून मनसेला डिवचण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला.दुपारी 12 च्या नंतर इथून चंद्रकांत खैरे यांची रॅली निघणार होती. त्याआधीच महायुतीचे कार्यकर् या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर या ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. सकाळी यांना रॅली काढायला सांगितली होती पण त्यांना सकाळी रॅली न काढता हे मुद्दामून दुपारी आले असा आरोप मनसे जिल्हाध्यक्ष यांनी केला आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती