xtreme2day 11-05-2024 12:55:09 156969
ब्राह्मण समाजातील तरुणांनी व्यवसायाला प्राधान्य द्यावे-उपेंद्र जपे पिंपळे सौदागर (प्रतिनिधी) - नोकरीच्या मागे न लागता सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून ब्राह्मण समाजातील तरुणांनी शासकीय योजनांचा आधार घेत व्यवसाय करण्याला प्राधान्य द्यावे असे आवाहन परशुराम सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष उपेंद्र जपे यांनी केले. पिंपळे सौदागर परिसरातील श्री संत ज्ञानेश्वर ब्राह्मण सभेच्या वतीने आयोजित परशुराम जयंती समारंभात ते बोलत होते. शुक्रवार दि. १० रोजी विलास जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रारंभी दिपप्रज्वलन आणि परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अतिशय उत्साहात झालेल्या या कार्यक्रमात लेखिका इंद्राणी सिन्हा, केशव नळगीरकर आणि ब्राह्मण सभेची युवा प्रतिनिधी तृप्ती जोशी यांनी आपल्या भाषणातून हिंदू संस्कृतीमधील भगवान परशुरामाची भूमिका आणि त्यांच्या कार्याचे महत्त्व विषद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचलन रमेश भट यांनी केले तर विजय न्यायाधीश यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वासंती जोशी, स्नेहा चिंचवडकर , शंतनुकुमार जोशी, अभिजित जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले.